शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Live In Relationship Rules in India: लिव्ह इनमध्ये बिनदिक्कत शरीर संबंध ठेवता येतात? सर्वोच्च न्यायालयाचे नियम काय सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2022 10:12 AM

1 / 9
पाश्चात्य देशांमधील लग्नाविना तरुण-तरुणीने एकत्र राहण्याची संस्कृती आता भारतातील शहरांमध्येच नाही तर छोट्या छोट्या शहरांमध्ये, गावांमध्ये देखील वाढू लागली आहे. लग्नाविना आपल्या प्रेमासोबत राहण्याची सोय म्हणजे लिव्ह इन. आजही अनेकजण या लिव्ह इन राहणाऱ्यांना घर भाड्याने देत नाहीत. कायद्यानुसार लिव्हइन हा गुन्हा नाही. अशा जोडप्यांना सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्यता दिली आहे.
2 / 9
श्रद्धा वालकर आणि आफताब देखील याच नात्यात राहत होते. त्यांनी भाडे करार करताना पोलिसांना पती-पत्नी असल्याचेही लिहून दिले होते. कदाचित श्रद्धालाही तिला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अधिकारांची माहिती नव्हती. लिव्ह इन जोडप्यांसाठी न्यायालयाने काही नियमही बिनविले आहेत. त्याचे त्यांना पालनही करावे लागले. काय आहेत हे नियम...?
3 / 9
दोन १८ वर्षे पूर्ण केलेले लोक परस्परांच्या सहमतीने एकमेकांसोबत राहू शकतात आणि कायद्याने ते अनधिकृत नाहीय, असे कोर्टाने म्हटलेले आहे. अशा जोडप्यांकडे कोर्ट पारंपरीक लग्न केलेल्या जोडप्यांप्रमाणेच पाहते. यासाठी त्यांना नियमांमध्येच रहावे लागेल. अल्पवयीन असल्यास मान्यता मिळत नाही.
4 / 9
लिव्ह इन रिलेशन तेव्हाच मान्य होते, जेव्हा ते दोघे पती-पत्नी प्रमाणे राहत असतील. यासाठी ठराविक काळ ठरविलेला नाही, परंतू ते दोघे सतत एकमेकांसोबत राहत असावेत. काही दिवसांसाठी एकत्र आले पुन्हा वेगळे झाले, पुन्हा एकत्र आले अशा संबंधांना लिव्ह इन मानले जात नाही.
5 / 9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेला पत्नीप्रमाणेच सहकाऱ्याकडून पोटगीचा अधिकार आहे. कायदेशीर पती पत्नी नसले तरी तिला या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
6 / 9
लिव्ह इनमध्ये असताना अपत्य झाले तर ते नाजायज नसते, तर त्याला त्याच्या आई वडिलांच्या संपत्तीमध्ये पूर्ण अधिकार असतो. यातून कोणतेही कपल सुटू शकत नाही.
7 / 9
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नाचा वादा करून जर शरीर सबंध प्रस्थापित केले आणि नंतर जर त्याने लग्न केले नाही तर तो गुन्हा मानला जाईल. या स्थितीत पीडित महिला किंवा पुरुष गुन्हा नोंदवून त्याला शिक्षा देऊ शकतो.
8 / 9
विवाहित पुरुष किंवा महिला दुसऱ्या १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीसोबत राहत असेल तर तो गुन्हा होत नाही. परंतू, जर त्याने किंवा तिने पहिल्या पती-पत्नीपासून घटस्फोट घेतला नसेल आणि दुसऱ्याशी लग्न केले तर हिंदू विवाह कायद्यानुसार तो गुन्हा ठरतो. अशा प्रकरणात इलाहाबाद आणि पंजाब उच्च न्यायालयांनी लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या दोन व्यक्तींना निर्दोष म्हटले आहे.
9 / 9
लिव्ह इनमध्ये राहत असताना मारहाण झाली तर ती महिला पोलिसांत लग्न झालेल्या महिलेप्रमाणे घरगुती हिंसाचाऱ्याच्या अधिनियम २००५ नुसार गुन्हा दाखल करू शकते.
टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरrelationshipरिलेशनशिपSupreme Courtसर्वोच्च न्यायालय