शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महिन्याला एवढी कमाई करणारी मुलं भारतीय मुलींची पहिली पसंत; अध्ययनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 11:35 AM

1 / 8
खरे तर लग्नासाठी मुलगी सुसंस्कारी असावी आणि मुलगा चांगल्या प्रकारे कमावणारा असा, हे पूर्वीपासूनच मानले जाते. ज्यावेळी अशा दोन व्यक्ती सोबत येतात तेव्हा विवाह यशस्वी होतो. मात्र आता मुलीदेखील कमवायला लागल्या आहेत. पण असे असले तरी, लग्नासाठी त्यांचे काम करणे फारसे महत्त्वाचे मानले जात नाही. पण यामुळे मुलांवरील अधिक कमावण्याचे दडपण नक्कीच वाढले आहे.
2 / 8
इंडियन मॅट्रिमोनिअल साइट शादी.कॉमने प्रसिद्ध केलेल्या 'इंडियाज मोस्ट एलिजिबल'च्या पहिल्या संस्करणातील आकडेवारी नुसार, भारतीय मुलींसाठी विवाहाकरता मुलांचा स्लॅलरी स्लॅब अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. अर्थात इतर गोष्टींच्या तुलनेत अधिक कमावणारी मुलं ही मुलींची पहिली पसंत असतात.
3 / 8
अशा परिस्थितीत, जर आपणही आपला आयुष्याचा जोडीदार शोधत असाल, तर आपली सॅलरी किमान येथे सांगितलेल्या सॅलरी स्लॅबपर्यंत आणण्याचा प्रयत्न सुरू करा. सॅलरी शिवाय, इतरही काही गोष्टी आहेत, ज्या आपल्याला लग्नाच्या दृष्टीने अधिक योग्य बनवतात.
4 / 8
लग्नात पैशांना एवढं महत्व का? - लग्नासाठी प्रेम आणि दोघांमधील ताळमेळ जेवढा महत्वाचा, तेवढेच महत्व पैशांनाही आहे. खरे तर, लग्नानंतर एका नव्या कुटुंबाची सुरूवात होत असते, अशा स्थिती खर्चही एक महत्वाची गोष्ट आहे. यासाठी पैशांचीच गरज पडते. यामुळेच कुटुंबातील सदस्य लग्नापूर्वी मुला-मुलींच्या कमाईची आणि प्रॉपर्टीची बारकाईने चौकशी करतात.
5 / 8
पैशांच्या कारणामुळे लग्न तुटू शकते? - पैशांच्या मुद्द्यावून भांडणं, हे घटस्फोटाचे दुसऱ्या क्रमांकाचे मुख्य कारण आहे. अनेकदा पैशांच्या कमतरतेमुळे जोडीदाराच्या आणि मुलांच्या गरजा पूर्ण करण्यात अडचणी येतात. यामुळे नातेसंबंधातील तणाव आणि चिंता वाढते. परिणामी अनेक वेळा जोडीदारांना परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळता येत नाही आणि लग्न तुटते.
6 / 8
पुरुषांना लग्नासाठी का कमवावे लागते? भारत हा पुरुषप्रधान संस्कृती असलेला आहे. आपल्या समाजात पूर्वीपासूनच एक परंपरा आहे, यानुसार पुरुष बाहेर कम करून कमावतात आणि स्त्रिया घर सांभाळतात. मात्र आता 21 व्या शतकात महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. तरीही त्या अधिक पैसा कमावणाऱ्या आणि उच्च शिक्षित पुरुषांसोबतच लग्न करण्यास प्राधान्य देतात. बहुतांश मुली तर, त्यांच्यापेक्षा कमी सॅलरी असलेल्या मुलांसोबत लग्न करू इच्छित नाहीत.
7 / 8
महिन्याला एवढी कमाई करणारी मुलं भारतीय मुलींची पहिली पसंत - अध्ययनातून समजते की, 7 लाख रुपये ते 10 लाख रुपये एवढे वार्षिक पॅकेज असलेल्या मुलांना इतर मुलांच्या तुलनेत लग्नासाठी 7 टक्क्यांपर्यंत अधिक प्राधान्य दिले जाते. याहून अधिक अथवा कमी सॅलरी स्लॅब असल्यास मुलांचे चान्सेस वाढत अथवा कमी होत जातात.
8 / 8
लग्नासाठी सर्वाधिक डिमांड 30 लाख हून अधिक कमाई असणाऱ्या मुलांची - मुली शक्यतो अशा मुलांसोबत लग्न करणे पसत करतात, जी मुलं आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या स्टेबल असतील. याशिवाय, त्यांच्या आवडी-निवडी एक्सेप्ट करणारी, त्यांना प्रेम आणि सन्मान देणारी, त्यांना प्रायोरिटी देणारी तसेच पार्टनर सोबतच एक मित्र म्हणून राहणारी मुलं मुली अधिक पसंत करतात.
टॅग्स :marriageलग्नrelationshipरिलेशनशिपMONEYपैसा