शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

"गर्लफ्रेंड एक्सचे कपडे धुते, जेवणही देते अन् विचारते...!" बॉयफ्रेंडनं सांगितली धक्कादायक गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 6:10 PM

1 / 10
भूतकाळ विसरून पुढे गेल्यास एका चांगल्या जीवनाची आणि नव्या नात्याची सुरुवात केली जाऊ शकते. मात्र, एका युवकाने रिलेशनशिप कॉलममध्ये आपली अनोखी समस्या शेअर केली आहे. या युवकाने आपली आप बिती सांगताना म्हटले आहे, की त्याच्या गर्लफ्रेंडचा (girlfriend) एक्स बॉयफ्रेंड (boyfriend) आजही तिला कपडे धुण्यासाठी पैसे देतो आणि रोज डिनरसाठी योतो. एवढेच नाही, तर आपल्या डोळ्यांसमोर हे सर्व पाहणे एका घाणेरड्या मजाक सारखे वाटते.
2 / 10
आपल्या नात्यातील कमतरता उघड करत या युवकाने सांगितले, 'माझी गर्लफ्रेंड (41) आणि तिचा एक्स (45) जवळपास 10 वर्षांपर्यंत सोबत होते. त्यांची एक मुलगीही आहे. ती 9 वर्षांची आहे. तिचा एक्स एकेकाळी हिंसक वृत्तीचा होता.' कदाचित तेव्हा दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. मात्र, एक दिवस तिचा एक्स आपल्या मुलीला पाहण्यासाठी परतला आणि अशा पद्धतीने त्या व्यक्तीची पुन्हा आमच्या आयुष्यात एन्ट्री झाली.
3 / 10
तो माझ्या गर्लफ्रेंडला म्हणाला, की सोबत असताना आपल्यात जे काही झाले, त्याबद्दल त्याला अत्यंत दुःख वाटते. त्याने मदतीसाठीही हात पुढे केला.
4 / 10
सुरुवातीला तो त्याच्या कामाचा मोबदला देत राहिला आणि नंतर तो आमच्या कुटुंबासोबत रोज दोन-दोन तास घालवू लागला. तो म्हणतो, की आम्ही सर्वजन त्याच्या सर्कलमध्ये आहोत. आणि माझी गर्लफ्रेंड त्याला विचारते, की 'डिनर कंसं झलं?'
5 / 10
उत्तरात तिचा एक्स म्हणतो, 'मांस थोडे कठीण आहे. ते मसाल्यांसह चांगले होऊ शकते.' हा कसला विनोद. मी 48 वर्षांचा आहे आणि मला आता वाटू लागले आहे, की आमचे नाते संपुष्टात आले आहे.
6 / 10
मी माझ्या गर्लफ्रेंडला समजावले, की तो आपला एखाद्या भांड्यासारखा वापर करत आहे. मात्र, ती म्हणते, की मी जळतो.
7 / 10
या काळात ब्लंडेड फॅमिली अत्यंत सामान्य गोष्ट आहे. मात्र, एक कपल असल्याने ही व्यवस्था आमचे नाते आणि आमच्या मुलीच्या भविष्यासाठी योग्य नाही.
8 / 10
याला उत्तर देताना रिलेशनशिप एक्सपर्टने म्हटले आहे, आपल्या पार्टनरवर त्याची पकड अजूनही अत्यंत मजबूत आहे. त्याने अत्यंत चलाकीने आपल्या पार्टनरचे डोके कंट्रोल केले आहे.
9 / 10
आपल्या पार्टनरला समजवा, की या व्यवस्थेमुळे आपले नाते दोन भागात विभागले जात आहे. या परिघातून बाहेर पडल्यानंतरच आपण सर्व जण आनंदी राहू शकतो.
10 / 10
रिलेशनशिप एक्सपर्टने म्हटले आहे, जर त्यांच्या पार्टनरच्या एक्सला त्याच्या मुलीला भेटायची इच्छा असेल तर, ते कॉन्टॅक्ट ऑर्डरच्या नियमानुसारच व्हायला हवे. याशिवाय, त्यांना कुठल्या प्रकारची मदत हवी असेल, तर ते नॅशनल डोमेस्टिक अब्यूस हेल्पलाइनचीही मदत घेऊ शकतात.
टॅग्स :relationshipरिलेशनशिपFamilyपरिवार