Parenting tips follow these 5 tips to handle child
तुमची मुलं जास्त चिडचिड करतायत?, तर 'या' गोष्टींची घ्या काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 2:04 PM1 / 7लहान मुलांची काळजी घेताना पालकांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे. मुलं अनेकदा हट्टी असल्याने पालकांना त्यांना समजून सांगणं थोडं अवघड जातं.2 / 7एखादी गोष्टी मनासारखी झाली नाही तर मुलं खूप चिडचिड करतात. त्यांचं वागणं आणि बोलणं बदलतं. अशा वेळी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ते जाणून घेऊया. 3 / 7लहान मुलं अनेकदा खेळताना भांडण करतात. त्यावेळी त्यांना मारू नका तर प्रेमाने समजून सांगा. त्यांच्या चिडण्यामागचं नेमकं कारण समजून घ्या. 4 / 7मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. अनेकदा भूक लागल्यामुळे मुलं चिडचिड करतात. त्यामुळे त्याचा आहार पोषक असावा. 5 / 7मुलं छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडत असतील तर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची आवड निर्माण करा. मुलांना क्रिएटिव्ह कामामध्ये व्यस्त ठेवा.6 / 7मुलांनी एखादी चूक केली तर आई-वडील लगेच रागवतात. मात्र दुसऱ्यांसमोर मुलांना ओरडू नका. यामुळे ते दुखावले जाऊ शकतात. 7 / 7सर्व पालक आपल्या मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत असतात. योगा आणि व्यायामामुळे मुलांचं आरोग्य उत्तम राहतं. ती शांत राहतात. त्यामुळे या गोष्टी शिकवा. आणखी वाचा Subscribe to Notifications