शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Promise day : नात्यातील विश्वास टिकवून ठेवायचा असेल तर 'या' गोष्टींचं प्रॉमिस करायला विसरू नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 9:47 AM

1 / 7
व्हॅलेनटाईन वीकचा आज पाचवा दिवस प्रॉमिस डे. आज अनेक कपल्स एकमेकांना प्रॉमिस करून आपल्या भावना व्यक्त करणार. तसं तर आपण अनेकदा पार्टनरला प्रॉमिस करत असतो. पण ते प्रॉमिस नेहमीच पूर्ण करतो असं नाही. तुमच्या बाबतीत सुद्धा असं होत असेल तर आज तुम्ही पार्टनरला, आईला किंवा कोणत्याही प्रिय व्यक्तीला प्रॉमिस करून आजचा दिवस साजरा करू शकता. पण प्रॉमिस कसं असावं याबाबत तुम्हाला काही कल्पना नसेल तर आम्ही तुम्हाला पार्टनरला कोणतं प्रॉमिस करायचं याबाबत सांगणार आहोत. त्यामुळे आज तुमची पार्टनर नक्की खूश होईल.
2 / 7
मी नेहमी तुझी साथ देईन- आयुष्यात कितीही दुःख अथवा संकटं आले तरी मी नेहमी तुला साथ देईन. तुझ्या यशस्वी होण्यासाठी सावलीप्रमाणे तुझ्यासोबत असेन. तुला एकटं वाटू देणार नाही.
3 / 7
तुझ्यावर कोणतंही संकट येऊ देणार नाही- सारं जग माझ्याविरोधात असेल तरी मी तुझ्यावर कोणतंही संकट येऊ देणार नाही. मी नेहमी तुझं रक्षणं करेन. कोणतीही व्यक्ती तुझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर असं काही होऊ देणार नाही. ज्यामुळे तुला त्रास होईल.
4 / 7
जबाबदारी- मुलांना सांभाळण्याची गोष्ट असेल किंवा जेवण बनवण्याची, जबाबदारी फक्त तुझीच नाही तर आपली आहे. जीवनातील चढ उतारांचा सामना आपण दोघे सोबत करू. घरच्यांची काळजी घेण्यात सुद्धा मी तुझ्यासोबत असेन.
5 / 7
प्रायोरिटी- सगळ्यात आधी माझी प्रायोरिटी तु असशील. तुझे स्थान माझ्या आयुष्यात सगळ्यांच्या आधी असेल. माझ्या मनात तुझ्यासाठी नेहमी सन्मान आणि आदर असेल.
6 / 7
मी तुझ्यावर नेहमी प्रेम करेन- पार्टनरला प्रॉमिस करत असताना मी तुझ्यावर नेहमी प्रेम करेन कधीही अंतर देणार नाही. माझ्या मनातील तुझ्यावरचं प्रेम कधीही कमी होणार नाही. हे प्रॉमिस करा.
7 / 7
पार्टनरला प्रॉमिस करत असताना गुलाबाचं फुलं किंवा भेटवस्तु द्याल तर तुमची पार्टनर खूप खूश होईल.
टॅग्स :Valentine Weekव्हॅलेंटाईन वीकrelationshipरिलेशनशिप