शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रत्येक तरूणांना तरूणींच्या या गोष्टी माहीत असाव्या, रहाल फायद्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 11:33 AM

1 / 8
तसं पहायला गेलं तर महिलांच्या मनातलं कुणालाच ओळखता येत नाही. त्यामुळे बरेच तरूण तरूणींना पटकन काहीही बोलून मोकळे होतात. तरूणींबाबत त्यांच्या मनात अनेक समज-गैरसमजही असतात. अशात तरूणांना तरूणींबाबत काही गोष्टी माहीत असायला हव्यात. चला जाणून घेऊ त्या काय आहेत.
2 / 8
आपलं कौतुक मुलींना थोडं जास्तच आवडतं. जर मुलींच्या नव्या ड्रेसचं किंवा ज्वेलरीचं कुणी कौतुक केलं तर त्यांना जाम भारी वाटतं. छोट्या छोट्या गोष्टींवर आनंदी होणं, नाराज होणं या त्यांच्या अदांमधील खास गोष्टी आहेत.
3 / 8
अर्थातच मुलींचं मन हे फार संवेदनशील असतं. मुलांपेक्षाही अधिक संवेदनशीलता मुलींमध्ये असते. मुली मुलांच्या तुलनेत अधिक इमोशनलही असतात. त्यामुळे त्यांच्याशी त्या पद्धतीने वागाल तर जास्त प्रेम मिळेल.
4 / 8
जास्तीत जास्त मुलींना मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारणं अधिक आवडतं. मैत्रिणींसोबत त्या दिलखुलास गप्पा करतात. कारण आपल्या समाजात आजही काही महिला आपल्या पतीसोबत मन मोकळं करू शकत नाहीत.
5 / 8
हसणं ही एक चांगली बाब आहे. याने कुणाचंही मन हलकं राहतं. हसणं सर्वांनाच आवडतं. ज्या मुलांचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला असतो अशी मुले मुलींना जास्त आवडतात. मुलींना हसवण्यासाठी वेगवेगळ्या करामती करणाऱ्या मुलांवर मुली जीव ओवाळतात.
6 / 8
मुली कोणत्याही बाबतीत मुलांपेक्षा कमी नसतात. पण तरीही मुलींच्या शरीराच्या कार्यप्रणालीत आणि मुलांच्या शरीराच्या कार्यप्रणालीत थोडं अंतर असतं.
7 / 8
प्रेम एकमेकांवर दोघांचंही असतं. पण काही वाद झाला तर दोष मात्र नेहमी मुलीलाच देण्यात येतो. त्यामुळे मुली आपल्या मनातील गोष्टी सांगण्यासाठी जरा कचरतात आणि व्यक्त होण्यासाठी त्या मुलांपेक्षा जास्त वेळ घेतात.
8 / 8
नेहमीच मुलींच्या बाबतीत ही धारणा असते की, सगळ्याच मुलींना मेकअप करणं अधिक पसंत आहे. पण असं नाहीये. काहींना ते आवडतं तर काहींना नाही. हा पूर्णपणे वैयक्तीक भाग आहे.
टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स