शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बच्चे कंपनीला बनवायचंय स्मार्ट, तर असं करा संगोपन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 4:18 PM

1 / 5
1. मुलांना योग्य शिक्षण द्यावं : सुरुवातीच्या तीन महिन्यांत मुलं हाताला जे लागेल ते तोंडामध्ये घालतात. प्रत्येक गोष्टीला त्यांना स्पर्श करायचा असतो. कोणतीही धोकादायक वस्तू किंवा पदार्थ त्यांच्या तोंडात जाऊ नये, यासाठी आईला बाळाचा खूप सांभाळ करावा लागतो. मात्र काहीही घडण्याची वाट पाहेपर्यंत आईनं आपल्या बाळा सुरक्षिततेचे धडे द्यायला सुरुवात करावी. बाळ लहान आहे असा विचार करू नये. यामुळे त्याला योग्य शिक्षण आणि ट्रेनिंग योग्य वेळीच देण्यास सुरुवात करावी.
2 / 5
2. लहान मुलांना कलात्मक गोष्टी शिकवाव्यात : लहान मुलांना नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी प्रचंड कुतूहल असते. त्यांना चित्र काढणे, काही आकृती तयार करण्यासाठी त्यांना चिकन माती किंवा पिठाचा गोळा द्यावा. यामुळे त्यांचा सकारात्मक विकास होतो आणि नवीन व कलात्मक गोष्टी शिकण्यास त्यांना मदत होते.
3 / 5
3. रात्री मुलांसोबत झोपावे पालकत्वाचा अर्थ केवळ आपल्या मुलांवर नजर ठेवणे असा होत नाही. त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी रात्रीच्या वेळेस त्यांच्यासोबत झोपावे आणि त्यांना निरनिराळ्या गोष्टी सांगाव्यात, गाणी गावावीत, अंगाई गीत ऐकवावे, जेणेकरुन त्यांचे मन शांत आणि प्रसन्न होईल.
4 / 5
4. शिस्तीचे पालन करण्याची शिकवण मुलांनी शिस्तीचे पालन करावे असे वाटत असल्यास पालकांनीही स्वतः शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे कारण लहान मुले नेहमी मोठ्या माणसांचं अनुकरण करत असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर नेहमी आदर्श उदाहरण निर्माण करावीत. त्यांच्यासोबत खेळावे, पूजा-अर्चना करावी, जेवण एकत्र करावे आणि हे सर्व करताना त्यांना शिस्तीचे महत्त्व पटवून द्यावे. त्यांना लहान व मोठ्यांसोबत कसा व्यवहार करावा, याचे ज्ञान द्यावे.
5 / 5
5. प्रत्येक गोष्ट प्रेमानं समजवावी लहान मुलांच्या भावना लक्षात घेता त्यांना शिस्तीचे महत्त्व पटवून देताना नेहमी प्रेमानं व्यवहार करावा. त्यांना प्रत्येक गोष्ट समजून द्यावी की जर तुम्ही असे वागणूक दिली तर मोठ्यांना ते आवडेल. पण हीच गोष्ट जर तुम्ही त्यांना ओरडून मारुन मुटकून केली तर त्यांना शिकण्यात काहीही आवड निर्माण होणार नाही.