some easy ways to get kids to read and learn
मुलांना शिकवण्याचे काही सोपे फंडे By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 4:37 PM1 / 6लहान मुलांना खेळायला जास्त आवडत असल्याने अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे मुलांना शिकवणं हे पालकांसाठी थोडं कठिण काम असतं. मुलांना शिकवण्याचे काही सोपे फंडे जाणून घेऊया. 2 / 6मुलांसोबत खेळताना त्यांना अनेक गोष्टी शिकवा. पुस्तकांसोबतच गणितातील आकडे आणि फॉर्मुले लक्षात राहावे यासाठी सोप्या ट्रिक्स वापरा. खेळताना शिकवलेल्या गोष्टी मुलांच्या कायम लक्षात राहतात.3 / 6लहान मुलांना फोटो अथवा वस्तू पाहायला आवडतात. त्यामुळे फोटो, वस्तू आणि व्हिडीओच्या मदतीने लहान मुलांना शिकवल्यास त्यांच्या ते लक्षात राहत. फोटो असलेल्या गोष्टी अधिक वेळ लक्षात राहतात. 4 / 6मुलांचा अभ्यास घेताना कठोर होऊ नका तर त्यांना प्रेमाने शिकवा. मुलांना खूप प्रश्न पडतात. त्यांच्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं द्या. 5 / 6मुलांनी अभ्यास केला नाही तर त्यांच्यावर पालक ओरडतात अथवा त्यांना एखाद्या गोष्टीची भीती दाखवली जाते. असं करू नका कारण अशा पद्धतीने वागल्यास मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो. 6 / 6मुलांना अभ्यासासोबतच बाहेर फिरायला घेऊन जा. तिथे त्यांना नवनवीन गोष्टींची माहिती द्या. मुलांना आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे कुतूहल असते. त्यामुळे त्यांना त्याची माहिती द्या. आणखी वाचा Subscribe to Notifications