some of your habits will keep children away from extravagance
मुलांना लावा सेव्हिंग्सची सवय; आयुष्यभरासाठी होईल मदत By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 3:10 PM1 / 8पालक मुलांवर उत्तम संस्कार करत असतात. लहान मुलं अनेकदा बाजारात नवनवीन वस्तू पाहतात. त्यांना त्या सर्व गोष्टी हव्या असतात. मात्र काही वस्तू या कधीकधी मुलांच्या उपयोगाच्या नसतात. त्यामुळे पालक त्या घेऊन देत नसल्याने मुलं नाराज होतात. 2 / 8मुलांना बचत करायला शिकवा तसेच त्याची सवय लावा. लहानपणापासून बचतीचे महत्त्व पटवून द्या. म्हणजे सेव्हिंग्सचा मुलांना आयुष्यभरासाठी फायदा होईल. 3 / 8मुलांना छानशी पिगी बँक गिफ्ट करा. त्यामध्ये त्यांना त्यांच्या खाऊची काही रक्कम साठवून ठेवायला सांगा. 4 / 8पिगी बँकमध्ये साठवलेले पैसे गरज असल्यास कसे वापरू शकतो हे मुलांना पटवून द्या. तसेच त्यांना पैशाचं महत्त्व पटवून द्या.5 / 8बाजारात रंगीबेरंगी आणि आकर्षक पिगी बँक उपलब्ध आहेत. 6 / 8लहान मुलांना बँकेत घेऊन जा. तसेच बँकेच्या कामकाजाची थोडी माहिती द्या.7 / 8मुलांना पैसे दिल्यास त्यांच्या खर्चावर लक्ष ठेवा. 8 / 8मुलांना नोटा आणि नाणी यांच्यातील फरक सांगा आणि त्याबाबत माहिती द्या. आणखी वाचा Subscribe to Notifications