शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लग्न झाल्यानंतर 'या' चुका कराल, तर पार्टनर कधी सोडून जाईल कळणार सुद्धा नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 6:03 PM

1 / 6
लग्न झाल्यानंतर फक्त सुंदर नात्याची सुरूवात होत नसते. तर दोन आयुष्य सुद्धा सुरू होत असतात. पण सध्याच्या काळातली खरी गोष्ट अशी आहे की लग्न झालेल्या कपल्सच्या नात्यात फारसा गोडवा उरलेला नसतो.
2 / 6
ते आपल्या आयुष्यात लगेच बोर होत असतात. सुरूवातीला नात्यात आनंद असतो. हळूहळू प्रेम कमी होत जातं. नात्यातील प्रेम कमी होण्यामागे तुमच्या चुकाच कारणीभूत असतात.
3 / 6
आपण लग्नाच्या आधी किंवा लग्न झाल्यानंतर पार्टनरची प्रशंसा भरपूर करतो. पण लग्न झाल्यानंतर काही वेळानंतर एकमेकांकडे बघणं सुद्धा बंद करतात. इतर व्यक्तींकडून कौतुकाचे शब्द ऐकल्यानंतर शरीरात 'हॅप्पी हॉर्मोन्स' जनरेट होत असतात. म्हणून जर तुम्हाला तुमचं नातं टिकवून ठेवायचं असेल तर पार्टनरची प्रशंसा करा. नवीन ड्रेस घातल्यावर किंवा एखादा पदार्थ तयार केल्यानंतर पार्टनरची प्रशंसा करा.
4 / 6
सध्याच्या काळात आपण मोबाईलवर खूप वेळ वाया घालवत असतो. त्यामुळे पार्टनरला जास्त वेळ देता येत नाही. त्यामुळे भांडण होण्याची शक्यता असते.पार्टनर तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे. याची जाणीव करून द्या.
5 / 6
अनेकदा तुम्ही घरच्या लोकांवर ऑफिसचा राग काढत असता. नेहमी पार्टनरशी इज्जत देऊन बोलण्याचा प्रयत्न करा. कारण पार्टनर तुम्हाला अनेक सुखात आणि कठिण प्रसंगात साथ देत असतो.
6 / 6
लग्न झालेले कपल्स ठरावीक वेळेनंतर एकमेकांप्रती प्रेम दाखवणं सोडून देतात. अशात एकमेकांना किस करणे, खुश झाल्यावर मिठी मारणे, प्रोब्लेममध्ये असल्यावर मांडीवर डोकं ठेवून रडणे, हातात हात घालून चालणे अशा प्रकारे प्रेम व्यक्त केल्यानंतर पार्टनर तुमच्यापासून लांब जाणार नाही.
टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप