शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या गोष्टींमुळे पती-पत्नीच्या नात्यात वाढतो गोडवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 7:22 PM

1 / 5
1. विश्वास असणं आवश्यक : विश्वास या एका गोष्टीवर तुम्ही पार्टनरचं हृदय जिंकू शकता. पती-पत्नीच्या नात्यात विश्वास असेल तर छोट्या-छोट्या गोष्टींवरुन वाद शक्यतो होत नाहीत.
2 / 5
2. छोटे-मोठे वादही गरजेचे : पती-पत्नीमध्ये छोटे-मोठे वाद होणंही गरजेचं आहे, कारण छोट्या-छोट्या भांडणातून प्रेम वाढते आणि नात्यात दुरावा येत नाही. पण हे वाद दीर्घकाळ राहू नयेत.
3 / 5
3. एकमेकांना सन्मान देणं महत्त्वाचं : पार्टनरच्या कोणत्याही चुकीवर त्याला/तिला ओरडण्याऐवजी किंवा त्यांना कमीपणा दाखवण्याऐवजी बोलून वादावर तोडगा काढवा. यामुळे नात्यात एकमेकांना दिला जाणार सन्मान टिकून राहतो.
4 / 5
4. भेटवस्तू देत राहा : नात्यात प्रेम कायम टिकून राहावं, यासाठी एकमेकांना भेटवस्तू देत राहा. पार्टनरला त्यांच्या आवडीच्या गोष्टी भेटवस्तू स्वरुपात द्या.
5 / 5
5.पार्टनरला जास्तीत जास्त वेळ द्या : आयुष्याच्या आपल्या व्यस्त वेळापत्रकातून पार्टनरला पुरेसा वेळ नक्की द्या. यामुळे वाद होणार नाहीत. पार्टनरला जास्तीत वेळ देण्याचा प्रयत्न करा.
टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न