things girlfriend judge in their boyfriend
गर्लफ्रेंडला कायम आनंदी ठेवायचंय? मग 'या' गोष्टींची घ्या काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 5:02 PM1 / 7प्रत्येक गोष्टीकडे बारीक लक्ष- मुलांच्या प्रत्येक गोष्टीकडे, त्याच्या वर्तनाकडे मुलींचं अगदी बारीक लक्ष असतं. तुमच्या नात्यात सर्वकाही सुरळीत असेल, तरी मुलींचं तुमच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे मुलींचं लक्ष असतं. त्यामुळे त्यांचं मन दुखावणार नाही, याची काळजी घ्या.2 / 7दुसऱ्यांचा आदर करा- अनेकदा मुलं त्यांच्या प्रेयसीचा खूप आदर करतात. मात्र इतरांना फार आदर देत नाहीत. या गोष्टीकडे मुलींचं लक्ष असतं. याचा त्यांच्या मनावर परिणाम होतो. 3 / 7बाहेरुन कणखर, आतून संवेदनशील- मुलींना कणखर मुलं अतिशय आवडतात. मात्र आपला प्रियकर बाहेरुन जितका कणखर, तितकाच तो आतून हळवा आणि संवेदनशील असावा, अशी मुलींची अपेक्षा असते. 4 / 7मित्रमैत्रिणींशी करा मैत्री- गर्लफ्रेंडनं तिच्या मित्रमैत्रिणींसोबत ओळख करुन दिल्यावर त्यांच्यासोबत मिळून मिसळून राहा. अनेकदा मुली त्यांचे सर्व निर्णय जवळच्या मैत्रिणीला विचारुन घेतात. अशावेळी गर्लफ्रेंडच्या मित्रपरिवाराचं तुमच्याविषयीचं मत चांगलं असणं गरजेचं असतं. 5 / 7ताण, दबाव सहन करण्याची क्षमता- प्रेमात परीक्षा असणारे क्षण खूप येतात. आर्थिक, कौटुंबिक, मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे प्रेमाचं नातं अधिक भक्कम होतं. मात्र या तणावपूर्ण परिस्थितीचा सामना कसा करता, हे महत्त्वाचं असतं. नातं संकटात असताना, तुम्ही नेमकं काय करता, याकडेही गर्लफ्रेंडचं लक्ष असतं. 6 / 7भविष्याचा गांभीर्यानं विचार- अनेकदा मुलं भविष्याच्या प्लान्सबद्दल फार बोलत नाहीत. मात्र मुलींना भविष्याबद्दल खूप आवडतं. भविष्याचं प्लानिंग करण्यापासून पळ काढत असाल, तर तुम्हाला दीर्घकाळ सोबत राहण्यात रस नाही, अशी शंका मुलींच्या मनात येऊ शकते. 7 / 7आनंदी स्वभाव- प्रत्येक परिस्थितीचा सामना करताना आनंदी असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळेच स्वत: कायम आनंदी राहणारी आणि आपल्या जवळच्या माणसांनाही आनंदी राहणारी मुलं मुलींना आवडतात. यामुळे नात्यातला गोडवा कायम राहतो. आणखी वाचा Subscribe to Notifications