#ValentineDay2018 : things to avoid in make up for valentines day
#ValentineDay2018 : मेकअपमध्ये करु नका या ५ चुका, नाहीतर व्हॅलेंटाईन डेला लुकसहीत दिवसही होईल खराब By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 7:38 PM1 / 7व्हॅलेंटाईन डे हा दिवसच असा असतो कि प्रत्येक मुलीला आपण सुंदर दिसावं, आपल्या प्रियकराचं पूर्ण लक्ष आपल्यावरच असावं असं वाटत असतं. म्हणूनच मुली आपलं सौंदर्य अजून खुलून दिसावं यासाठी मेकअप करतात. पण व्हॅलेंटाईन डेला तुम्ही तुमच्या मेकअपमध्ये काही चूका केल्यात तर तुमचा मेकअप आणि त्यामुळे तुमचा दिवसही बिघडू शकतो.2 / 7१) गडद रंगाने डोळ्याचा मेकअप करणं टाळा - व्हॅलेंटाईन डेला तुमच्या डोळ्यांचा मेकअप हा साधाच ठेवावा. फक्त काजळ किंवा आयलायनरने तुमचे डोळे खूप सुंदर दिसू शकतात. पण जर तुम्ही गडद रंगाचे आयशॅडो वापरणार असाल तर तुमच्या प्रियकराचं लक्ष हे तुमच्या डोळ्यांकडे न जाता तुमच्या मेकअपकडे जाऊ शकतं.3 / 7२) केसांसोबत कोणताही नवीन प्रयोग करू नका - प्रत्येक मुलीला व्हॅलेंटाईन डे दिवशी आपण वेगळं दिसावं असं वाटत असतं. पण किमान यादिवशी केसांवर कोणतीही नवीन स्टाईल ट्राय करू नका. तुम्ही यापूर्वी करत आलेली आणि तुम्हाला सुट होते अशी हेअरस्टाईलच करा.4 / 7३) चेहऱ्याचा मेकअप जास्त करू नका - जास्त मेकअप हा नेहमीच तुमचा लूक खराब करू शकतो. म्हणून तुमचा मेकअप जितका शक्य तेवढा साधाच ठेवा. जास्त मेकअपमुळे काही वेळाने चेहरा हा निस्तेज दिसू शकतो. तसंच मुद्दाम आज जास्त मेकअप केल्याचं इतरांच्या दिसण्यात येऊ शकतं.5 / 7४) सवयीच्या वस्तूच वापरा - तुम्ही जर चष्मा वापरत असाल तर व्हॅलेंटाईन डेला लेन्स वापरण्याचा प्रयत्न करू नका. कारण जर तुम्हाला लेन्सची सवय नसेल तर तुम्हाला त्याचा त्रासही होऊ शकतो आणि आजसारख्या खास दिवशी कोणालाच हे असे त्रास झालेले आवडणार नाहीत.6 / 7५) केस मोकळे ठेवू नका - व्हॅलेंटाईन डे दिवशी जर तुम्ही केस मोकळे ठेवणार असाल तर ते थोड्याच कालावधीसाठी ठेवा. पण जर तुम्हाला केस मोकळे ठेवायचेच असतील तर एखादा चांगला हेअर स्प्रे वापरून तुम्ही बाहेर पडू शकता त्यामुळे तुमचे केस हे चमकदार दिसतीलच व सुगंधही चांगला येईल. तसंच जास्त वेळ मोकळे राहील्यानंतरही ते विस्कटणार नाहीत.7 / 7खरंतर सुंदर दिसण्यासाठी किंवा नटण्यासाठी काही कारण नाही लागत पण असे खास दिवस किंवा क्षण हातून जाता कामा नयेत किंवा बिघडता कामा नयेत, म्हणून आमच्याकडून तुमची ही लहानशी मदत. आणखी वाचा Subscribe to Notifications