शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Valentine's Day ; कुठे फोटो जाळून तर कुठे तमालपत्रं उशीवर ठेवून, जगभरातील देशात 'असा' साजरा होतो व्हॅलेंटाईन डे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 5:43 PM

1 / 9
व्हॅलेंटाईन डे भारतात कसा साजरा करतात हे तुम्हाला माहीत असेल पण जगातील इतर देशात व्हॅलेंटाईलन डे हा हटके आणि वेगवेगळ्या प्रकारात साजरा केल जातो. आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या देशात व्हॅलेंटाईन डे कसा साजरा केला जातो हे सांगणार आहोत.
2 / 9
ब्राजीलमध्ये व्हॅलेंटाईन डे फुलं आणि चॉकलेट्स तसंच कार्ड्सच्या भेटवस्तु दिल्या जातात. तुम्हाला हे वाचून विश्वास बसणार नाही. पण या ठिकाणी १२ जून ला व्हॅलेंनटाईन डे साजरा केला जातो. या ठिकाणचे लोक हा दिवस सेंट एंथोनी डे च्या स्वरूपात साजरा करतात.
3 / 9
फ्रांसचा समावेश जगातील रॉमॅंटिक ठिकाणांमध्ये होतो. या ठिकाणी तरूण तरूणींची जोडी तयार केली जाते. जर मुलीला मुलगा आवडत नसेल आणि इतर मुलींना पसंत करत असेल तर ती मुलगी आवडत नसलेल्या मुलाचा फोटो जाळून व्हॅलेंटाईन डे साजरा करते. बॉनफायर करून मुलाचा फोटो जाळत असतात.
4 / 9
डेनमार्कमध्ये १९९० पासून व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. या ठिकाणी पुरूष महिलांना कार्ड देत असतात.
5 / 9
इंग्लंडमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी महिला आपल्या उशीवर तमालपत्र ठेवत असतात.
6 / 9
इटलीमध्ये व्हॅलेंटाईन डे स्प्रिंग फेस्टिवलच्या स्वरूपात साजारा केला जातो. यावेळी तरूण गार्डनमध्ये एकत्र होत असतात. म्युझिकचा आनंद घेत असतात. असं मानंल जातं की याठिकाणी लग्न न झालेल्या मुली सकाळी लवकर उठतात. त्यांना जो पुरूष सगळयात आधी बघतो. तोच त्या मुलीचा पती होण्याची शक्यता असते.
7 / 9
जपानमध्ये व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी एकमेकांना थॅंक्स म्हणतात. तसंच आपल्या कुटुंबीयांना धन्यवाद करण्यासाठी चॉकलेट सुद्धा देतात.
8 / 9
फिंलिपींसमध्ये व्हॅलेनटाईन डे च्या दिवशी हजारो कपल्स एकत्र येत असतात. मग एखाद्या सार्वजनिक जाऊन विवाह करत असतात.
9 / 9
वेल्स या ठिकाणी २५ जानेवारीवा व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. कपल्स एकमेकांना लाकडाचे चमचे देऊन शुभेच्छा देतात. या चमच्यांना लव्ह स्पून्स म्हणतात.
टॅग्स :relationshipरिलेशनशिपValentine Weekव्हॅलेंटाईन वीक