शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुलींना प्रपोज करताना करू नका ह्या चुका, अन्यथा बिघडू शकतं नातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 09:58 IST

1 / 6
सध्या व्हॅलेंटाइन आठवडा सुरू आहे. त्यामुळे अनेक प्रियकर आपल्या आवडत्या मुलीला आपल्या मनातील गोष्ट सांगण्याची, प्रेम व्यक्त करण्याची तयारी करत आहेत. सध्याच्या काळात कुठल्याही मुलीशी मैत्री करणं, तिला डेटवर घेऊन जाणं तितकंसं कठीण राहिलेलं नाही. मात्र एखाद्या मुलीला प्रपोज करणं मात्र प्रेमवीरांसाठी अजूनही आव्हानात्मक ठरतं. तसेच मुलींना प्रपोज करताना योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही तर प्रेमात नकार मिळू शकतो. त्यामुळेच आम्ही आज तुम्हाला अशा काही चुका सांगणार आहोत ज्या मुलींना प्रपोज करताना टाळल्यास प्रपोज यशस्वी ठरू शकतं.
2 / 6
सरप्राइज सर्वच मुलींना आवडतं. मात्र अचानक प्रपोज करणं काही मुलींना आवडत नाही. कदाचित एखाद्या मुलीच्या मनात तुमच्याबाबत तशी भावना नसेल, अशा परिस्थितीत तुम्ही तिला अचानक प्रपोज केलं तर नात्यात अडचण उद्भवू शकते. त्यामुळे जर एखाद्या मुलीला प्रपोज करायचं असेल, तर तुम्ही आधी तिच्याशी मैत्री करा. तुम्हाला ती आवडते, मात्र तुम्ही हे बोलत नाही आहात याची जाणीव तिला करून द्या. त्यानंतर तिला तुमच्या तिच्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव होईल. तसेच तुम्ही जेव्हा तिला प्रपोज कराल, तेव्हा ती नकार देणार नाही.
3 / 6
तुम्ही जर कुठल्यातरी सार्वजनिक ठिकाणी मुलीला प्रपोज करत असाल, तर तुमची ही पद्धत तिला चुकीचा वाटू शकते. याचं कारण म्हणजे अनेक मुलींना त्यांचं नातं खासगी ठेवायला आवडतं. त्यामुळे आधी तुम्हाला आवडणाऱ्या मुलीशी मैत्री करताना तिला सार्वजनिकपणे प्रपोज केलेलं आवडेल का, याचा अंदाज घ्या आणि मगच तसं पाऊल उचला.
4 / 6
एखादी मुलगी काही दिवसांपूर्वीच भेटली असेल आणि तुम्ही फारशी ओखळ झाली नसताना अचानक तिला प्रपोज केलं तर तुम्हाला नकार मिळू शकतो. त्यामुळे आधी आपल्या नेत्याला वेळ द्या. जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीला अगदी कमी ओळखीमध्ये प्रपोज करतो, तेव्हा ती मुलगी अशा प्रपोजकडे गांभीर्याने पाहत नाही. तसेच हा मुलगा कुणालाही अशा प्रकारे प्रपोज करू शकतो, असं तिला वाटू शकतं.
5 / 6
जर तुम्ही एखाद्या मुलीला वर्षभरापासून ओळखत असाल, मात्र तुम्ही तिच्यासोबत फार कमी वेळ एकत्र घालवला असेल तर तुम्ही तिला प्रपोज करता कामा नये. मात्र जर एखाद्या मुलीसोबत तुम्ही फार वेळ घालवला असेल आणि ती तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिला प्रपोज करू शकतात. थोडक्यात सांगायचं तर जर तुम्ही एखाद्या मुलीला खूप चांगल्या पद्धतीने ओळखत असाल, तुम्ही एकमेकांना समजून घेत असाल, तुमच्यातील नातं दृढ झालेलं असेल तर तुम्ही प्रपोज करण्यासाठी पुढाकार घेऊ शकता. मात्र एखाद्या मुलीशी तुमच्या फारश्या भेटीगाठी झाल्या नसतील आणि तुमचं फारसं बोलणंही झालं नसेल तर तुम्हाला नकार मिळू शकतो.
6 / 6
जसं घाईगडबडीमध्ये कुठलाही विचार न करता प्रपोज करणं जसं चुकीचं आहे, तसेच प्रपोज करण्यास खूप उशीर लावणं हे सुद्धा चुकीचं ठरू शकतं. जर तुम्ही आपल्या भावना व्यक्त करण्यास वेळ लावला तर तुम्हाला त्यांच्यामध्ये काही रस नाही आहे, असं समोरच्या व्यक्तीला वाटू शकतं. त्यामुळे योग्य वेळ पाहून प्रपोज करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship TipsरिलेशनशिपValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे