#ValentineWeek2018 : what to do on Teddy Day to impress a girl
#ValentineWeek2018 : 'टेडी डे'ला कसं कराल मुलीला इंप्रेस, पाहा कोणत्या टेडीने होतात मुली खुश! By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 7:26 PM1 / 6मुंबई : फेब्रुवारी महिना आला म्हणजे वातावरणातच प्रेमाचे तरंग उठू लागतात. व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त सगळेच रोमँटीक मुडमध्ये असतात. एव्हाना अनेकांचे प्लॅनसुध्दा तयार आहेत. 2 / 6काळानुरुप सगळ्याच पध्दती बदलल्या आहेत. आता हे सेलिब्रेशन फक्त व्हॅलेंटाईन्स डेपुरतं मर्यादित राहिलं नाहीये. रोझ डेपासून सुरु असलेलं हे सेलिब्रेशन आता सलग ८ दिवस व्हॅलेंटाईन डेपर्यंत केलं जातं.3 / 6आज १० फेब्रुवारी म्हणजेच टेडी डे. मुलींना टेडी किती आवडतात हे तर सगळ्यांना माहित्येय. मऊ, गुबगुबीत आणि गोड-गोंडस टेडी सगळ्यांनाच आवडतो. हल्ली तर मिकी माऊस, डोनाल्ड डक, पँडा, मिनी माईस, मिनिअन हेसुध्दा टेडी स्वरुपात अनेकांच्या घरात, बॅग्जवर, मोबाईलला, की-चैन म्हणून पाहायला मिळतात.4 / 6 हल्ली तर मोठ्या टेडींपेक्षा की-चैन टेडींचं फॅड सगळ्यात जास्त आहे. हे की-चैन टेडी दिवसभर बॅग किंवा मोबाईल की-चैनच्या स्वरुपात आपल्याजवळ असतात. त्यातही पिंक टेडी मुलींना सगळ्यात जास्त आवडतो आणि रेड टेडी त्यांना आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून आपल्या प्रेमाला उजाळा नेहमी देतो.5 / 6तरीही मोठ्या टेडीची मज्जाच निराळी आहे. कारण आपल्याला त्याला मिठी मारता येते. म्हणूनच असा मोठा टेडीसुध्दा अनेकांचा फेव्हरीट आहेच. कारण त्याला मिठी मारल्यावर तो गिफ्ट करणाऱ्याची आठवण आल्यावाचून राहत नाही.6 / 6टेडीसोबत एक सुंदरसा, ताज्या लाल गुलाबांचा गुच्छ, चॉकलेट किंवा एखादी अंगठी देऊन मुलीला सहज इंप्रेस करु शकता. कारण हे सरप्राईज त्यांच्यासाठी नक्कीच कधीच न विसरण्यासारखं असेल. यानंतर कोणतीच मुलगी तुम्हाला नाही बोलू शकत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications