Why boys want to marry with working girl know their opinion myb
म्हणून मुलं घरी बसलेल्यांपेक्षा जॉबला जाणाऱ्या मुलींनाच लग्नासाठी निवडतात! By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 4:39 PM1 / 10लग्न करण्यासाठी पर्फेक्ट पार्टनर मिळणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. जर मुलांच्या दृष्टीकोनातून विचार केला तर त्यांना सुंदर आणि चांगल्या घरातील मुली लग्न करण्यासाठी हव्या असतात. पण बदलत्या काळात मुलांच्या लग्नासाठी मुली निवडण्याच्या संकल्पना सुद्दा बदलल्या आहेत. 2 / 10सध्याच्या काळात मुलांना वर्किंग असलेल्या मुली आवडतात. अनेकांना ब्यूटी विथ ब्रेन्स आवडतात. यामागे अनेक कारणं आहेत. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत ती कारणं.3 / 10जबाबदारी वाटण्यासाठी उत्तम- कोणत्याही कामात एका व्यक्तीवर भार येऊ देता, पैशाची, घरची जबाबदारी एकमेकांमध्ये वाटून घेता येते. जॉबला जात असलेल्या महिला तुलनेने समजूतदार असतात. म्हणून वाद होण्याची शक्यता सुद्धा कमी असते. 4 / 10वेळेच्या बाबतीत समजूतदारपणा- अनेकदा ऑफिसमध्ये काम करताना वर्क लोड वाढलेला असते. मिटिंगसाठी वेळ लागतो. अशावेळी घरी पोहोचायला उशीर होत असतो. तेव्हा जर वर्किंग पार्टनर असेल तर तुम्हाला समजून घेऊ शकते. वादाला तोंड फुटण्याऐवजी शांतपणे समस्या सुटू शकते. 5 / 10इतरांवर अवलंबून राहावं लागत नाही-कोणतीही शॉपींग करण्यासाठी किंवा मुलांच्या खर्चाची जबाबदारी कोणा एकावर येत नाही. म्हणून मुलांना कमावणारी मुलगी लग्न करण्यासाठी हवी असते. 6 / 10घर चालवणं सोपं जातं- दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. खाण्यापिण्याच्या वस्तुंपासून इतर गोष्टींसाठी चांगली मिळकत असणं गरजेचं आहे. पण सध्याच्या काळात एकटं संपूर्ण घर चालवणं शक्य होत नाही. म्हणून मुलांना वर्किंग मुलींशी लग्न करायला आवडतं.7 / 10घर चालवणं सोपं जातं- दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. खाण्यापिण्याच्या वस्तुंपासून इतर गोष्टींसाठी चांगली मिळकत असणं गरजेचं आहे. पण सध्याच्या काळात एकटं संपूर्ण घर चालवणं शक्य होत नाही. म्हणून मुलांना वर्किंग मुलींशी लग्न करायला आवडतं.8 / 10इमोशनली खूप स्ट्राँग असतात- वर्किंग वुमन्स या इमोशनली खूप स्ट्राँग असतात. त्यांना भावनांमध्ये जास्त गुंतून जायला आवडत नाही. अनेकदा मुलांना समस्यांचा सामना करावा लागतो तेव्हा आधाराची गरज असते. अशावेळी वर्किंग वुमन्स जास्त चांगल्या पद्दतीने समजून घेतात. 9 / 10वेळ देण्यावरून भांडणं होत नाहीत. कामाच्या गडबडीत असल्यामुळे दोघंही एकमेकांना समजून घेतात. 10 / 10वेळ देण्यावरून भांडणं होत नाहीत. कामाच्या गडबडीत असल्यामुळे दोघंही एकमेकांना समजून घेतात. आणखी वाचा Subscribe to Notifications