Why overthinking is harmful for you?
'या' ७ गोष्टी वाचल्यावर कळेल Overthinking करणं किती नुकसानकारक? By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 12:51 PM1 / 9अनेकदा मित्रांसोबत, गर्लफ्रेन्डसोबत भांडण झाल्यावर आपण विचार करतो की, मी असं करायला नको होतं किंवा समस्या सोडवली जाऊ शकत होती. त्यानंतर आपण त्यावर विचार करून करून डोक्याचा भुगा करून घेतो. पण असं करणं मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी कसं नुकसानकारक आहे हे अनेकांना माहीत नसतं. ते कसं हे खालील गोष्टी वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. (Image Credit : mrsmindfulness.com)2 / 91) Overthinking मुळे डिप्रेशनची समस्या - कोणत्याही गोष्टीबाबत अधिक चिंता केल्याने तुम्ही डिप्रेशनचे शिकार होऊ शकता. याने तुम्ही लवकर चिडू लागता आणि गोष्टींकडे नकारात्मक विचाराने बघू लागता. तुम्ही तुमच्या भूतकाळाशी चिकटून राहता. (Image Credit : Vision.org)3 / 92) प्रॉडक्टिव्हिटी कमी होते - अधिक जास्त विचार केल्याने अर्थात तुमच्या प्रॉडक्टिव्हिटीवर प्रभाव पडतो. तुम्ही तुमच्या अभ्यासावर किंवा कामांवर फोकस करू शकत नाहीत. त्यामुळे विचार करा पण फार जास्त विचार करू नका. (Image Credit : hpigrp.com) 4 / 9३) नेहमीसाठी नुकसान - तुम्ही तुमच्या जोकवर हसण्याची चिंता कराल किंवा एक्सने रिप्लाय न केल्याने पुन्हा पुन्हा फोन चेक कराल. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला केवल त्रास मिळेल. याने तुमच्यात नकारात्मक विचारच येतील. आणि हा प्रभाव सहजपणे मनातून काढणे फार कठीण आहे. (Image Credit : www.inc.com) 5 / 9४) समस्या दूर करणे कठीण - Overthinking तुमच्यासाठी फार मोठी अडचण ठरू शकते. जर वेळीच हे थांबवलं गेलं नाही तर याची तुम्हाला सवय लागू शकते. मग यापासून सुटका मिळवणे फार कठीण होऊन बसेल. (Image Credit : www.stuff.co.nz)6 / 9५) मानसिक थकवा येतो - अधिक जास्त विचार केल्याने तुमचा मेंदू लवकर थकतो, ज्याने तुम्ही मानसिक आजारी होऊ शकता. तुम्ही तुमच्या मनात लोकांची चुकीची प्रतिमा तयार करता आणि स्वत:ला रक्षात्मक करू लागता. यातून तुम्ही नवीन काही शिकू शकणार नाही. (Image Credit : www.sciencenews.org) 7 / 9६) समस्येचं समाधान नाही Overthinking - समस्या दूर करण्यासाठी एक तर्कसंगत विचार करण्याची गरज असते. Overthinking करून काहीही मिळत नाही. Overthinking कराल तर तुम्हाला समस्या अधिक मोठी दिसू लागते. (Image Credit : nameberry.com)8 / 9७) शारीरिक थकवा - अधिक विचार केल्याने मन शांत राहत नाही. त्यामुळे शरीर त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतं. जसे की, हृदयाचं धडधडणं वाढणे, जोरात श्वास घेणे इत्यादी. याप्रकारच्या तणावामुळे तुम्हाला लवकर थकवा जाणवतो. (Image Credit : coach.nine.com.au)9 / 9त्यामुळे जेव्हाही तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही अधिक विचार करताय, तेव्हा मोठा श्वास घ्या आणि तो विषय तिथेच सोडून पुढे चला. हे तुमच्यासोबतच दुसऱ्यांसाठीही फायद्याचं ठरेल. जर यानेही काही फरक पडत नसेल तर तुम्हाला आवडतं ते काम करा. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (Image Credit : theascent.pub) आणखी वाचा Subscribe to Notifications