शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवाळीत १ ग्रॅम सोन्याचं ब्रेसलेट घ्यायचं? बघा हाताचं सौंदर्य खुलविणारे ८ लेटेस्ट फॅशनचे डिझाईन्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2024 9:09 AM

1 / 8
सोनं खूपच महागलं आहे. त्यामुळे दिवाळीत सोन्याचा एखादा दागिना घेणं सर्वसामान्यांना परवडणारं नाही. म्हणूनच यंदाच्या दिवाळीत अस्सल सोन्याऐवजी १ ग्रॅम सोन्याचे ब्रेसलेट घेण्याचा विचार करत असाल तर हे काही पर्याय तुम्हाला आवडू शकतात.
2 / 8
हे एक सुंदर, नाजुक डिझाईन पाहा. कोणत्याही वयोगटातल्या महिलेच्या हातावर ते नक्कीच खुलून दिसेल.
3 / 8
बारीक स्टोन लावलेलं हे डिझाईन पाहताक्षणीच आवडणारं आहे. एखाद्या पार्टीमध्ये तुमच्या हातावर हे ब्रेसलेट असेल तर तुमचं व्यक्तिमत्त्व नक्कीच आणखी उठून दिसेल.
4 / 8
मंगळसूत्र घालण्याऐवजी असं ब्रेसलेट हातात घालण्याची क्रेझ हल्ली खूप वाढत चालली आहे. त्यामुळे असं एखादं तुमच्या कलेक्शनमध्ये हवंच..
5 / 8
हल्ली रुद्राक्ष जडवून गळ्यातलं, अंगठी किंवा ब्रेसलेट करण्याचं प्रमाण वाढलं आहे. तुम्हालाही ते आवडत असेल तर या डिझाईनचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता.
6 / 8
अगदी रोज वापरायला हे डिझाईन खूप छान आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणींनाही ते खूप शोभून दिसेल.
7 / 8
सणावाराला किंवा खूप ठराविक प्रसंगी घालण्यासाठीच ब्रेसलेट घेण्याचा विचार करत असाल तर हा एक पर्याय तुम्हाला आवडू शकतो.
8 / 8
सणावाराला किंवा खूप ठराविक प्रसंगी घालण्यासाठीच ब्रेसलेट घेण्याचा विचार करत असाल तर हा एक पर्याय तुम्हाला आवडू शकतो.
टॅग्स :ShoppingखरेदीDiwaliदिवाळी 2024jewelleryदागिनेGoldसोनंfashionफॅशन