शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

10 Cheap Vegetarian Protein Sources : प्रोटिन, कॅल्शियमसाठी नॉनव्हेज कशाला हवं? भरभरून प्रोटीन देतील रोजच्या जेवणातील १० व्हेज पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 11:32 AM

1 / 11
प्रथिने (Protein) आपल्या शरीराला ऊर्जा देतात. आपल्या रोजच्या आहारात प्रोटीनची गरज असते. जेणेकरून आपण निरोगी राहू शकाल. सामान्यतः मांसाहार हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. हे खरे आहे की मांसामध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त आहे. पण याचा अर्थ असा नाही की, शाकाहार करून शरीरातील प्रथिनांची कमतरता दूर होऊ शकत नाही रोज जेवणातील काही पदार्थ खाऊन तुम्ही प्रोटीन्सची कमतरता पूर्ण करू शकता. (Best options for a proteins rich diet for vegetarian)
2 / 11
चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स तसेच प्रथिने भरपूर असतात. यासोबतच पिठात व्हिटॅमिन-बी, झिंक, लोह आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात. ज्यामुळे त्याचे पचन आणि पोषण अनेक पटींनी वाढते.
3 / 11
दूध हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. पण कॅल्शियमसोबतच प्रथिनेही दुधापासून मिळतात. यामुळेच दूध तुमच्या शरीरातील स्नायूंना मजबूत करण्याचे काम करते.
4 / 11
जर तुम्ही दररोज काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि मखनाचे सेवन केले तर तुम्हाला आयुष्यात कधीही प्रोटीनची कमतरता भासणार नाही. या सर्व ड्रायफ्रुट्सचे मिश्रण करून तुम्ही रोज किमान मूठभर ड्रायफ्रुट्स खावेत आणि एक ग्लास दूध प्यावे.
5 / 11
ज्या लोकांना दूध प्यायला आवडत नाही, त्यांनी रोज दुपारच्या जेवणात एक वाटी दही खावे. यामुळे तुम्हाला प्रथिने तर मिळतीलच, सोबतच पोटात गारवाही येईल.
6 / 11
चण्यांना स्प्राउट्सच्या स्वरूपात नाश्त्याचा भाग बनवू शकता. जर तुम्ही दिवसाच्या सुरूवातीला नाष्त्यासाठी शिजवलेले चणे खाल्ल्यास तुम्हाला दिवसभर काम करण्यासाठी सतत ऊर्जा मिळेल. कारण ते तुम्हाला भरपूर प्रोटीन देतात.
7 / 11
दूध आणि दह्याव्यतिरिक्त, ताक आणि लस्सी देखील प्रथिने मिळविण्यासाठी उत्तम पेय आहेत. न्याहारी आणि दुपारच्या जेवणादरम्यान तुम्ही त्यांचे सेवन करू शकता. उन्हाळ्याच्या हंगामात, ते दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाच्या दरम्यान घेतलेल्या संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये देखील घेतले जाऊ शकतात.
8 / 11
राजमामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्ही तुमच्या वाढत्या वजनाने हैराण असाल तर आठवड्यातून किमान दोनदा राजमा नक्कीच खावा. कारण यामुळे तुमच्या शरीराला फॅट न वाढता भरपूर प्रोटीन मिळते. हे तुम्हाला सक्रिय ठेवते.
9 / 11
सोयाबीनचे सेवन डाळी, मैदा, इत्यादी स्वरूपात करू शकता. हा प्रथिनांचा नैसर्गिक स्रोत आहे. हे आठवड्यातून 2 ते 3 वेळा वेगवेगळ्या स्वरूपात सेवन केले जाऊ शकते.
10 / 11
फुलकोबी, हिरवे वाटाणे, पालक आणि मशरूम, शतावरी आ वाळलेल्या शेंगा. या काही भाज्या आहेत, ज्या तुमच्या शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे दिवसाच्या तीनही मुख्य जेवणात या भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे.
11 / 11
तूर, उडीद, मूग, मसूर, हरभरा, चणे इत्यादी कडधान्यांचे नियमित सेवन करावे. दिवसभरातील तिन्ही जेवणांमध्ये किमान दोन वेळा वेगवेगळ्या कडधान्यांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे रोजच्या अन्नातून शरीराला प्रथिने मिळतात.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य