शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काजू - बदाम सोडा; स्वयंपाकघरातली १ गोष्ट मूठभर खा; ताकद वाढेल; वजनही घटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2024 4:39 PM

1 / 10
'गरिबाचे बदाम' अर्थात शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत (Peanuts). शेंगदाण्याचा वापर आपण अनेक पदार्थांमध्ये करतो. शेंगदाण्यामध्ये अनेक गुणधर्म असतात. ज्याला आरोग्याचा खजिनाही म्हणतात (Health Benefits). त्यात प्रोटीन, गुड फॅट्स, जीवनसत्त्वे, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम असते. पण शेंगदाणे खाण्याचे फायदे किती? हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा किंवा कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते(10 Lesser known health benefits of eating peanuts daily).
2 / 10
युनायटेड स्टेड डिपार्टमेण्ट ऑफ अॅग्रिकल्चरच्या रिपोर्टनुसार, शेंगदाणा पौष्टीक घटकांचा भांडार आहे. हे एक प्रोटीन, फायबर आणि गुड फॅट्सचे उत्तम सोर्स आहे. शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे वेट लॉस, गुड कोलेस्टेरॉल आणि हृदयासाठीही फायदेशीर ठरते.
3 / 10
शेंगदाण्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. जे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात. शिवाय गुड कोलेस्टेरॉल म्हणजेच एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्यास मदत करतात.
4 / 10
शेंगदाण्यामध्ये फायबरचे प्रमान्जास्त असते. जी साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. जर आपली शुगर लेव्हल कमी- जास्त होत असेल तर, शेंगदाण्याचा आहारात जरूर समावेश करा.
5 / 10
जर आपल्याला वेट लॉस करायचं असले तर, शेंगदाण्याचा अवश्य आहारात समावेश करा. शेंगदाण्या प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. शिवाय भूक नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.
6 / 10
शेंगदाण्यामध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे मुक्त रेडिकल पेशींशी लढण्यास मदत करतात, आणि कर्करोगाचा धोका कमी करतात.
7 / 10
शेंगदाण्यातील फायबर पोटाचे विकार दूर ठेवण्यास मदत करतात. शिवाय पचनसंस्था निरोगी आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते.
8 / 10
मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण शेंगदाणे खाऊ शकता. यात व्हिटॅमिन ई आणि बी ६ असते. जे मेंदूच्या कार्याला चालना देतात. स्मरणशक्ती सुधारण्यास आणि मेंदूची शक्ती वाढवण्यास मदत करतात.
9 / 10
शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियम आणि मँगनीज असते जे हाडे मजबूत करण्यास आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी करण्यास मदत करते.
10 / 10
त्वचा आणि केसांसाठीही शेंगदाणे फायदेशीर ठरते. शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन ई असते. जे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य