शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पोटदुखी ते कोलेस्टेरॉल- मधुमेहापर्यंत कित्येक दुखण्यांवर असरदार उपाय म्हणजे १० जादुई बिया! रोज खाल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2024 11:59 AM

1 / 11
आपल्या स्वयंपाक असे अनेक लहानसहान पदार्थ किंवा बिया, दाणे असतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण तेच पदार्थ अनेक आजार पळवून लावण्यासाठी उपयुक्त ठरतात.
2 / 11
ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी dietitian_manpreet या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यात त्यांनी सांगितलेला पहिला पदार्थ आहे बडिशेपाचे दाणे. कॉन्स्टीपेशनचा त्रास असेल तर दररोज दुपारचं जेवण झाल्यानंतर बडिशेपाचा काढा प्या. पोट साफ राहील.
3 / 11
दररोज भाेपळ्याच्या बिया खाल्ल्याने इन्सुलिन सेन्सिटीव्हीटी वाढते. त्यात मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं.
4 / 11
सुर्यफुलाच्या बिया चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतात.
5 / 11
रोजच्या जेवणात तीळ नियमितपणे खा. त्यात असणारे कॅल्शियम हाडांचे दुखणे कमी करते.
6 / 11
अळीवाचे दाणे नियमितपणे खाल्ल्यास केस गळणं कमी होतं.
7 / 11
चिया सीड्स दरराेज खाल्ल्याने ओमेगा ३ आणि इतर काही घटक असतात, जे त्वचेसाठी अतिशय उपयुक्त ठरतात.
8 / 11
जवसाचे दाणे नियमितपणे खाल्ल्यास कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
9 / 11
रात्री धणे पाण्यात भिजत घाला आणि दररोज सकाळी ते गाळून प्या्. यामुळे शरीरावरची सूज कमी होते तसेच थायरॉईडचा त्रास कमी होतो.
10 / 11
सब्जाचं पाणी नियमितपणे प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहाते.
11 / 11
ओव्याच्या नियमित सेवनाने पचनाशी संबंधित बरेच त्रास कमी होतात.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नdiabetesमधुमेह