शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२४ कॅरेट सोन्याचा चहा! सना खान म्हणे सोन्याचा चहा पितेय, काय असतो हा चहा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 6:17 PM

1 / 9
प्रसिद्ध अभिनेत्री सना खान नुकतीच दुबईतील बुर्ज खलिफा याठिकाणी असलेल्या अॅटमॉसफिअर या हॉटेलमध्ये गेली होती. तिने त्याठिकाणी सोन्याचा चहा प्यायला. तेव्हापासून या सोन्याच्या चहाची चर्चा सुरू आहे. आता हा सोन्याचा चहा नेमका असतो काय याविषयी जाणून घेऊया.
2 / 9
आपल्याला आपण रोज पितो तो दुधाचा चहा, ब्लॅक टी, ग्रीन टी, लेमन टी, कोल्ड टी असे काही प्रकार माहित आहेत. पण गोल्ड टी हा प्रकार आपल्यासाठी तुलनेने नवा आहे. गोल्ड म्हटल्यावर यामध्ये खरंच सोनं असतं का असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो. तर यामध्ये २४ कॅऱेट खरं सोनं असतं.
3 / 9
चहा पिण्याचा कप सोन्याचा आहे किंवा एखादा पदार्थ खाण्याची डीश सोन्याची आहे. इतकंच नाही तर अंगात घालायचे कपडे सोन्याच्या तारेपासून तयार केलेले आहेत असं आपण ऐकतो पण सोन्याचा पदार्थ आपल्यापैकी फार कमी जणांनी पाहिला किंवा टेस्ट केला असेल.
4 / 9
हा गोल्ड टी बनवण्यासाठी सोन्याच्या पानांव्यतिरिक्त अनेक औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर केला जातो. त्यामुळे चहा, साखर आणि दूध किंवा चहाचा मसाला या व्यतिरिक्त इतर अनेक घटक यामध्ये असतात.
5 / 9
एरवी चहा प्रमाणात प्यावा किंवा चहा कसा प्यावा याचे काही नियम आपण ऐकतो. पण हा सोन्याचा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. आरोग्यासोबतच त्वचेसाठीही हा चहा पिणे खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी होण्यास मदत होते असे म्हणतात.
6 / 9
चहाप्रमाणेच सोन्याची कॉफीही काही जण आवर्जून पितात. अरब देशांमध्ये अशाप्रकारचे शोक करणारी बडी मंडळी आजही आहेत. त्यामुळे आपल्याकडे हे प्रकार फारसे ऐकायला किंवा पाहायला मिळत नसले तरी या देशांमध्ये या गोष्टी पाहायला मिळतात.
7 / 9
एरवी चहा प्रमाणात प्यावा किंवा चहा कसा प्यावा याचे काही नियम आपण ऐकतो. पण हा सोन्याचा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. आरोग्यासोबतच त्वचेसाठीही हा चहा पिणे खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी होण्यास मदत होते असे म्हणतात.
8 / 9
चहा म्हटले की एक कप चहाची किंमत साधारण २० ते ५० रुपये. पंचतारांकित हॉटेलध्ये ५०० ते १००० रुपये असू शकते. पण हा गोल्ड टी असल्याने Atmosphere Dubai मध्ये मिळणाऱ्या या 24 कॅरेट चहाची किंमत तब्बल ३३०० रुपये आहे. त्यामुळे सामान्यांना हा एक चहा पिणे परवडणारे नाही.
9 / 9
चांदीचा वर्ख असलेली मिठाई आपण खातो. यामध्ये खऱ्या अर्थाने चांदीचा वापर असतो का याबाबत सांगता येणार नाही. पण गोल्ड टी मध्ये सोन्याचा वर्ख चहाच्या वरच्या बाजुला घालत असल्याचे दिसते.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलfoodअन्नDubaiदुबईsana khanसना खानGoldसोनं