3 simple changes in your hair care that helps to get rid of dandruff and hair fall or hair loss
डोक्यात खूप कोंडा झाला? फक्त ३ गोष्टी करा, कधीच कोंडा होणार नाही- केसही वाढतील By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2023 9:06 AM1 / 6डोक्यात खूपच कोंडा झाला असेल तर तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये हे काही बदल करा. यामुळे डोक्यातला कोंडा कमी होईल.2 / 6केस खूप गळत असतील तर त्याचेही प्रमाण या उपायाने कमी होईल. शिवाय केसांची चांगली वाढ होऊन केस दाट, मजबूत होण्यास मदतही होईल. हे उपाय drmanojdasjaipur या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आले आहेत.3 / 6यामध्ये सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचे केस ड्राय, नॉर्मल किंवा ऑईली या कोणत्याही प्रकारातले असले तरी केसांना आर्गन मोरकन ऑईने मसाज करा. यामुळे केस चमकदार होण्यास मदत होते.4 / 6sodium lauryl sulphate हा घटक ज्या शाम्पूमध्ये नसतो म्हणजेच जो शाम्पू SLS-free शाम्पू म्हणून ओळखला जातो, तोच शाम्पू केसांसाठी वापरावा.5 / 6आठवड्यातून एक वेळा जास्वंदाच्या हेअर पॅकने केसांना मालिश करा. ही पावडर तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही मेडिकलमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळेल. ॲलोव्हेरा जेल टाकून ही पावडर भिजवा आणि तो पॅक केसांना लावा.6 / 6हे ३ बदल केले तरी काही दिवसांतच केसांच्या आरोग्यामध्ये खूप चांगला बदल दिसून येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications