शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PCOS चा त्रास होतो- पाळीत पोटही खूप दुखतं? ३ पदार्थ नियमित खा, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2024 4:00 PM

1 / 6
मासिक पाळीत पोट दुखण्याचा त्रास अनेकांना होतो. त्याशिवाय हल्ली पीसीओएस चा त्रास होण्याचे प्रमाणही खूपच वाढले आहे.
2 / 6
बदललेल्या जीवनशैलीमुळे आपल्या शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे मग पीसीओएस किंवा पीसीओडी असा त्रास असणाऱ्या मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.
3 / 6
हा त्रास कमी करायचा असेल तर आहारात असे काही पदार्थ घेणं गरजेचं आहे, ज्यामुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होईल. ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी chitchatrajlavi या पेजवर शेअर केली आहे. ते ३ पदार्थ म्हणजे PCOS चा त्रास कमी करणारे सूपरफूड आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे.
4 / 6
यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ आहे नारळ. नारळाचे पाणी, नारळाची चटणी किंवा नुसते नारळ अशा वेगवेगळ्या माध्यमांतून नारळ खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास तसेच वाढते वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.
5 / 6
दुसरा पदार्थ आहे जवस (flaxseed). जवसामध्येही असे काही पदार्थ असतात, ज्यांच्यामुळे पीसीओएसचा त्रास नियंत्रित राहण्यास मदत होते.
6 / 6
तिसरा पदार्थ आहे डाळिंब. मासिक पाळीतल्या वेदना किंवा पीसीओएस दरम्यान झालेले हार्मोन्सचे असंतुलन यासाठी डाळिंब अतिशय उपयुक्त ठरते. पीसीओएस चा त्रास कमी करण्यासाठी हे पदार्थ तर आहारात घ्याच, पण त्यासोबतच healthier lifestyle जगण्याचा प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सMenstrual Healthमासिक पाळी आणि आरोग्यfoodअन्नAyurvedic Home Remediesघरगुती उपाय