4 amazing uses of rice water, how to reuse rice water
तांदूळ धुवून पाणी फेकून देता? ४ पद्धतींनी वापरा- बघा राईस वॉटरचे एकापेक्षा एक भन्नाट उपयोग By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2024 9:12 AM1 / 7रोजचा स्वयंपाक करताना आपण कुकर लावण्यापुर्वी तांदूळ धुतो आणि त्याचं पाणी कोणताही विचार न करता सरळ सिंकमध्ये टाकून देतो. पण हे पाणी तुम्हाला किती पद्धतींनी उपयोगी ठरू शकतं ते एकदा पाहा..(4 amazing uses of rice water)2 / 7रोजच्या रोज तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी आपण निरुपयोगी म्हणून टाकून देतो त्याचे किती चांगले उपयोग करता येऊ शकतात, ते पाहा. हे उपयोग पाहिल्यानंतर तुम्ही तांदूळ धुतल्यावर पाणी टाकून देण्यापुर्वी नक्कीच एकदा तरी विचार कराल.(how to reuse rice water?)3 / 7सहसा तांदूळ दोन ते तीन वेळा धुतात. पहिल्यांदा तांदूळ धुतल्यानंतरचे पाणी टाकूनच द्या. कारण त्या पाण्यात तांदळाला लावलेली औषधी पावडर मिसळलेली असते. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या धुण्याचं पाणी मात्र वेगवेगळ्या कामासाठी नक्कीच वापरू शकता.4 / 7तांदूळ धुतलेल्या पाण्यामध्ये अमिनो ॲसिड, व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात. त्यामुळे ते केसांच्या वाढीसाठी चांगलं असतं. शाम्पू केल्यानंतर हे पाणी केसांना लावा. एक- दोन मिनिटांसाठी केसांवर राहू द्या आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने केस धुवून टाका. केस जास्त सिल्की, मऊ होतील.5 / 7तांदळाचं पाणी चेहऱ्याला लावा आणि ५ ते ७ मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून टाका. यामुळे त्वचेतला टाईटनेस टिकून राहण्यास मदत होते. त्वचा चमकदार दिसू लागते. अधिक चांगला परिणाम दिसून येण्यासाठी राईस वॉटर अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा आणि त्यानंतर हा उपाय करा.6 / 7आठवड्यातून एकदा तांदळाचं पाणी रोपांना घाला. रोपांसाठी ते उत्तम खत आहे.7 / 7तांदळाचं पाणी तुमच्या पाळीव प्राण्यांचं अंग धुण्यासाठीही वापरू शकता. यामुळे त्यांच्या अंगावरील केस अधिक चमकदार आणि मऊ होतात, असं म्हटलं जातं. आणखी वाचा Subscribe to Notifications