5 AMAZING BENEFITS OF EATING DRAGON FRUIT, ANTI OXIDENTS RICH FRUIT
ड्रॅगनफ्रुट खाण्याचे ५ फायदे, सुपरफुड म्हणतात या फळाला ते काही उगीच नाही, चवीलाही गोड By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2023 12:34 PM1 / 7काही ड्रॅगनफ्रुट चवीला खूप गोड असतात. तर काहींना अजिबातच चव नसते. शिवाय ते इतर फळांच्या तुलनेत महागही असतात. त्यामुळे अनेकजण ड्रॅगनफ्रुट खाणं टाळतात. पण असं करू नका. कारण ड्रॅगनफ्रुट हे ॲण्टीऑक्सिडंट्स आणि न्युट्रियंट्सचं सुपरफूड मानलं जातं. 2 / 7ड्रॅगनफ्रुट खाण्याचे हे ५ फायदे वाचा... यानंतर फार विशेष आवडत नसलं तरी अगदी नियमितपणे ड्रॅगनफ्रुट खाल.. सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी नुकत्याच त्यांच्या एका व्हिडिओमध्ये ड्रॅगनफ्रुट खाण्याचे फायदे समजावून सांगितले आहेत. 3 / 7ड्रॅगनफ्रुटमधून खूप कमी प्रमाणात कॅलरी मिळतात. त्यामुळे वेटलॉस करणाऱ्यांसाठी हे फळ खाणं फायदेशीर ठरतं.4 / 7 ड्रॅगनफ्रुट पचायला हलकं असतं कारण त्यात भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे आजारी व्यक्तीला किंवा लहान मुलांनाही ते द्यायला हरकत नाही.5 / 7ड्रॅगनफ्रुटमधून लोह भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे ॲनिमिया असणाऱ्या व्यक्तींना हे फळ नियमितपणे खावं.6 / 7ड्रॅगनफ्रुटला ॲण्टीऑक्सिडंट्सचं सुपरफूड मानलं जातं. 7 / 7डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठीही ड्रॅगनफ्रुट खाणं खूप महत्त्वाचं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications