शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वाढलेलं वजन भराभर कमी करणारी ‘ही’ ५ पेयं, वजनाचा काटा सरसर उतरेल-पाहा यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2024 3:50 PM

1 / 7
वाढत्या वजनाची चिंता करत असाल तर आता ती सोडा आणि डॉक्टरांनी सुचविलेले हे काही उपाय करून पाहा. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाला ही माहिती अतिशय उपयुक्त ठरणारी आहे.
2 / 7
हल्ली बरेच जण वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग (Intermittent Fasting) करतात. म्हणजेच दिवसातल्या २ ठराविक वेळांना जेवायचं आणि बाकी दिवस मात्र कोणताही पदार्थ खायचा नाही. अशावेळी दोन जेवणांच्या दरम्यान जर भूक लागलीच तर हे काही पदार्थ प्या (5 amazing weight loss drinks). यामुळे तुमच्या शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होईल (how to lose weight quickly?), अशी आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी दिलेली माहिती झी न्यूजने प्रकाशित केली आहे.(best method of weight loss)
3 / 7
यामध्ये त्यांनी सांगितलेले सगळ्यात पहिले पेय आहे लिंबू पाणी. लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते. तसेच त्यातून खूपच कमी कॅलरी पोटात जातात. लिंबूपाण्यामुळे शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स होण्यास मदत होते. तसेच चयापयक क्रिया अधिक उत्तम झाल्याने शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
4 / 7
नारळ पाण्यातून कमीतकमी कॅलरी आणि भरपूर एनर्जी मिळते. त्यामुळे बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. शिवाय शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठीही नारळपाणी अतिशय उपयुक्त ठरते.
5 / 7
तिसरा पदार्थ आहे ग्रीन टी. त्यामध्ये असणारे घटक मेटाबॉलिझम अधिक उत्तम करण्यास मदत करतात. त्यामुळे पचन चांगले होऊन शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. जेवणाच्या आधी ग्रीन टी घेणे अधिक चांगले मानले जाते.
6 / 7
भरपूर प्रमाणात पाणी पिणंही गरजेचं आहे. पुरेसं पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर जाऊन शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
7 / 7
ॲपल साईड व्हिनेगर डायल्यूट करून प्यायल्यानेही भूक लागण्याचं प्रमाण बरंच कमी होतं असं आहारतज्ज्ञ आयुषी सांगतात. हे पदार्थ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असले तरी तुमच्या तब्येतीनुसार तुमच्यासाठी काय अधिक चांगले आहे, हे आहारतज्ज्ञांकडून जाणून घेणे आणि त्यानुसारच स्वत:चा डाएट ठरवणे अधिक उत्तम.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्सWaterपाणी