5 calcium rich food, food that gives more calcium than milk, superfood for calcium
दुधापेक्षाही भरपूर कॅल्शियम देणारे ५ पदार्थ, दूध नकोच म्हणणाऱ्या मुलांना 'हे' पदार्थ खाऊ घाला By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2024 2:50 PM1 / 7कॅल्शियम मिळण्याचा एक उत्तम स्त्रोत म्हणजे दूध. त्यामुळे बऱ्याचजणी मुलांना मागे लागून, आग्रह करून दूध प्यायला देतात. पण मुलं मात्र ते अजिबात आवडीने पित नाहीत.2 / 7म्हणूनच मुलांना दूध आवडत नसेल तर कॅल्शियमसाठी त्यांना काही वेगळे पदार्थ खाऊ घाला. या पदार्थांमध्ये दुधाएवढंच किंबहुना त्याहूनही अधिक प्रमाणात कॅल्शियम असतं. ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती डॉक्टरांनी dr.harshalikalamkarmalvi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.3 / 7त्यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ आहे नाचणी. नाचणीमध्ये कॅल्शियम उत्तम प्रमाणात असतं. त्यामुळे नाचणीचा पराठा, उपमा, इडल्या असं तुम्ही मुलांना देऊ शकता.4 / 7दुसरा पदार्थ म्हणजे हिरव्या पालेभाज्या. त्यातही पालक आणि मेथी जास्त प्रमाणात द्यावे.5 / 7तिसरा पदार्थ आहे चिया सिड्स. ते रात्रभर पाण्यात भिजवत ठेवा आणि सकाळी ते पाणी मुलांना प्यायला द्या.6 / 7दूधाएवढंच कॅल्शियम देणारा चौथा पदार्थ आहे तीळ. तिळाची चटणी किंवा पराठ्यांवर, पकोड्यांवर, कटलेट्सवर तीळ लावून तुम्ही ते मुलांना खायला देऊ शकतात. 7 / 7शेवगा हा देखील कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. त्यासाठी शेवग्याचे सूप मुलांना नियमितपणे प्यायला द्या. आणखी वाचा Subscribe to Notifications