शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कॅलरीज कमी होऊन झटपट होईल वेटलॉस, रुटीनमध्ये करा फक्त ५ सोपे बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2022 8:18 AM

1 / 7
१. आपल्या नेहमीच्या रुटीनमधल्या काही चुकीच्या सवयीच वजन वाढीसाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे या सवयी जर बदलल्या तर निश्चितच कॅलरीचा इनटेक कमी होऊन वेटलॉस होण्यासाठी फायदा होऊ शकतो.
2 / 7
२. यासाठी नेमकं काय करायचं, याविषयी आहारतज्ज्ञ आणि फिटनेस एक्सपर्ट यांनी दिलेली ही विशेष माहिती.
3 / 7
३. वजन कमी करायचं असेल तर आपलं शरीर नेहमीच हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे पाणी भरपूर प्या. यामुळे चयापचय क्रिया, पचन क्रिया चांगल्या होतात. त्यामुळे आपोआपच वेटलॉस होण्यास मदत होते. तसंच पुरेसं पाणी पोटात असेल की भूकही कमी लागते. पाण्याऐवजी फळं, फळांचा रस असंही घेऊ शकता. यातलं साखरेचं प्रमाण मात्र मर्यादित ठेवा.
4 / 7
४. वेटलॉससाठी शारिरीक हालचाल अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे सुर्यनमस्कार, वार्मअप असे व्यायाम नियमित करा. यापैकी काही होत नसेल, तर चालण्याची सवय ठेवा. जवळ जायचं असेल तर गाडीऐवजी पायी चालत जाण्याला प्राधान्य द्या.
5 / 7
५. रोज दोन्ही वेळचं जेवण घरीच घेतल्यानेही कॅलरी पोटात जाण्याचं प्रमाण खूप मर्यादित राहतं. बाहेरचं अन्न नेहमीच घेण्याची सवय असेल तर त्यातून अधिकाधिक कॅलरी पोटात जातात आणि मग झटपट वजन वाढतं. त्यामुळे शक्यतो घरी शिजलेलं ताजं अन्न खाण्यास प्राधान्य द्या.
6 / 7
६. अनेक जण वजन कमी करायचं म्हणून नाश्ता करणं टाळतात. पण नाश्ता करणं कधीच टाळू नका. कारण सकाळच्या वेळी चयापचय क्रिया अधिक वेगवान असते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होऊन दिवसभर उर्जा टिकून राहण्यास मदत होते.
7 / 7
७. जेवणात फक्त पोळी, भाकरी, भात खाण्यावरच भर देऊ नका. पोळी किंवा भाकरी, भात, भाज्या, कडधान्ये तसेच फळं यांचं आहारातील प्रमाण समान ठेवा.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealthy Diet Planआहार योजनाExerciseव्यायाम