शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मांड्यांवरची चरबी दिवसेंदिवस वाढतच चालली? रोज ५ योगासनं करा, मांड्यांची जाडी होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2024 4:38 PM

1 / 8
बैठ्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या आहारपद्धतीमुळे आणि एकंदरीतच चालणं कमी झाल्यामुळे हल्ली बऱ्याच जणांचं वजन झपाट्याने वाढत चाललं आहे
2 / 8
हिप्सचा भाग, मांड्या, पोटऱ्या या ठिकाणची चरबी वाढल्यामुळे पाय खूपच बेढब दिसतात, अशी अनेकांची तक्रार असते. तुमचंही असंच झालं असेल तर मांडी, पोटऱ्या आणि हिप्स फॅट कमी करण्यासाठी काही व्यायाम नियमितपणे करून पाहा.
3 / 8
सगळ्यात पहिलं आसन आहे वीरभद्रासन. या आसनामध्ये दोन्ही पाय बऱ्यापैकी ताणले जातात. त्यामुळे मग मांड्या, पोटऱ्या आणि नितंब या भागातली चरबी कमी होण्यास मदत होते.
4 / 8
दुसरं आसन आहे उत्कटासन. यालाच चेअर पोझ असंही म्हणतात. यामध्ये मांड्यांवर आणि पोटऱ्यांवर खूप ताण येतो. शिवाय गुडघे आणि घोटे यांच्या बळकटीसाठीही हे आसन फायदेशीर आहे.
5 / 8
मांड्यांवरची चरबी कमी करून पायांना व्यवस्थित आकारात आणण्यासाठी नटराजासन करणेही अतिशय उपयोगी ठरते. हे योगासन थोडे अवघड आहे. पण हळूहळू प्रयत्नपुर्वक नक्कीच जमू शकते.
6 / 8
उपविष्ट कोनासन हे योगासन नियमितपणे केल्यास मांड्यावरची चरबी निश्चितच कमी होईल. हे आसन देखील करायला थोडे अवघड आहे. पण सरावाने ही आसनस्थिती नक्कीच जमू शकते. सुरुवातीला काही सेकंदांसाठी जमले तरी करा. हळूहळू आपोआप आसनस्थिती जास्त वेळ टिकेल.
7 / 8
मांड्यांवरची चरबी कमी करण्यासाठी सेतूबंधासन करणेही फायद्याचे ठरेल.
8 / 8
५ ते १० सुर्यनमस्कार तुम्ही नियमितपणे केले तरी मांड्यांवरची चरबी बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सExerciseव्यायामYogaयोगासने प्रकार व फायदेWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स