शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

डॉक्टर सांगतात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी फक्त ५ गोष्टी करा- म्हातारे झालात तरी नजर राहील तेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2024 9:04 AM

1 / 7
हल्ली प्रत्येकाचाच स्क्रीनचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे कमी वयातच अनेकांना चष्मा लागतो आहे. लहान मुलांमध्येही चष्मा असण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.
2 / 7
त्यामुळेच आपल्या रुटीनमध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्यावी जेणेकरून लवकर चष्मा लागणार नाही किंवा डोळे छान निरोगी राहतील याविषयी डॉक्टरांनी दिलेली ही माहिती एकदा बघा. ही माहिती डॉ. मनदीप सिंग यांपी gunjanshouts या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
3 / 7
सकाळी उठल्यानंतर डोळ्यांवर पाणी मारा आणि डोळे स्वच्छ धुवा. डोळे धुताना ते चोळू नका.
4 / 7
सकाळी उठल्यानंतर लगेचच मोबाईल बघू नका. मोबाईलच्या प्रकाशामुळे डोळ्यांवर खूप ताण येतो.
5 / 7
दर ६ महिन्यांनी डोळे तपासणी करून घ्या.
6 / 7
जर स्क्रीनवर सतत काम असेल तर दर अर्ध्या तासाने थोडा ब्रेक घ्या. यावेळी डोळे मिटून शांत बसा..
7 / 7
दररोज काही वेळ चाला आणि दूरच्या गोष्टींकडे नजर केंद्रित करा.. काही मिनिटांसाठी दुरच्या गोष्टी पाहात जा..
टॅग्स :eye care tipsडोळ्यांची निगाHome remedyहोम रेमेडी