कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवायचे तर रोज खा ५ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात हार्टवरचा ताण कमी करायचा तर.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2022 2:47 PM
1 / 8 १. चुकीची जीवनशैली आणि आहारात झालेला बदल यामुळे कमी वयातच कोलेस्टरॉल लेव्हल वाढण्याच्या तक्रारी अनेक जणांना जाणवत आहेत. 2 / 8 २. त्यामुळेच कमी वयात हार्ट अटॅक येणं किंवा हृदयविकार मागे लागणं, याचेही प्रमाण वाढले आहे. यासाठी डॉक्टरांचा योग्य सल्ला आणि त्यानुसार घेतलेली औषधी, पुरेसा व्यायाम या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच. पण त्यासोबतच काही अन्नपदार्थ आपल्या रोजच्या आहारात घेणंही खूप गरजेचं आहे. 3 / 8 ३. म्हणूनच कोलेस्टराॅलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करणारे पदार्थ कोणते, याविषयी माहिती देणारी पोस्ट इन्स्टाग्रामच्या gunjanshoutsandimwow.in या पेजवर शेअर करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना कोलेस्टरॉलचा त्रास आहे, अशा लोकांनी पुढील ५ पदार्थ नियमितपणे खावेत. 4 / 8 ४. सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे बदाम, अक्रोड आणि पिस्ता हा सुकामेवा. यांना हार्टफ्रेंडली नट्स असंही म्हटलं जातं. त्यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात हेल्दी फॅट्स असतात. शिवाय हे पदार्थ व्हिटॅमिन्स, फायबर, ॲण्टीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत मानले जातात. 5 / 8 ५. दुसरा पदार्थ म्हणजे तुळशीची पाने. या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के यासोबतच फॉलेट, आयर्न आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं. 6 / 8 ६. कोलेस्टरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दालचिनीही अतिशय उपयुक्त ठरते. त्यातही व्हिटॅमिन सी, के तसेच लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. 7 / 8 ७. चाैथा पदार्थ म्हणजे आलं. आल्यामध्ये असणारे कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम कोलेस्टरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात. 8 / 8 ८. पाचवा पदार्थ आहे लसूण. लसूणला देखील हार्ट फ्रेंडली फूड म्हणून ओळखलं जातं. कोलेस्टरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज थोडा तरी लसूण आहारात असायलाच हवा. आणखी वाचा