शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुलांना कमी वयातच चष्मा लागू नये म्हणून ५ पदार्थ खाऊ घाला; नजर कमजोर होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2024 12:55 PM

1 / 8
काही अपवाद सोडले तर हल्ली प्रत्येक घरातल्या मुलांचं स्क्रीन टाइमिंग खूप वाढत चाललेलं आहे. यामुळे डोळे तर कमजोर होत जातात. त्यामुळे मग शाळेत मागच्या बेंचवर बसल्यास मुलांना फळ्यावरचं नीटसं दिसत नाही. (eye care tips for kids)
2 / 8
अशातच मुलांचा आहारही व्यवस्थित नसतो. पौष्टिक पदार्थ खाण्यास ते नेहमीच टाळाटाळ करतात. याचाही परिणाम डोळ्यांवर होतो आणि मग बऱ्याच मुलांना कमी वयातच चष्मा लागतो. (best food for good vision)
3 / 8
म्हणूनच मुलांची नजर कमजोर होऊ नये आणि त्यांना चष्मा लागू नये, म्हणून काही पदार्थ आवर्जून खायला द्या. ते पदार्थ नेमके कोणते याची माहिती अमेरिकन जर्नल ऑफ ऑप्थॅल्मालॉजी यांनी प्रकाशित केली आहे. (5 foods to prevent children from getting glasses at an early age)
4 / 8
त्या यादीमध्ये सांगण्यात आलेला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे पालक. पालकामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे डोळ्यांचे आरोग्य जपले जाते.
5 / 8
दुसरा पदार्थ आहे बटाटे. बटाट्यांमध्ये डोळ्यांसाठी उपयुक्त ठरणारे बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट चांगल्या प्रमाणात असतात.
6 / 8
व्हिटॅमिन ई आणि इतर अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात देणारे बदाम मुलांना दररोज खाऊ घालायला पाहिजेत.
7 / 8
संत्री, मोसंबी अशा लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होण्यास मदत होते.
8 / 8
व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात देणारी सिमला मिरची मुलांना नियमितपणे खायला द्या.
टॅग्स :eye care tipsडोळ्यांची निगाHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नHealthआरोग्य