शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे अशा ५ गोष्टी, एकाग्रता वाढून अभ्यासात मन रमेल- तब्येतही सुधारेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2024 9:05 AM

1 / 6
बऱ्याचदा आपण असं पाहतो की बहुतांश विद्यार्थ्यांचे अभ्यास करताना मन लागत नाही, एकाग्र होत नाही. अभ्यासात छान मन रमावे आणि प्रगतीपुस्तकावरही त्याचा चांगला परिणाम दिसून यावा, यासाठी विद्यार्थ्यांनी काही गोष्टी आवर्जून केल्याच पाहिजेत.
2 / 6
त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे स्क्रिनपासून जास्तीतजास्त दूर राहण्याचा प्रयत्न करा. तो एक खूप मोठा भुलभुलैय्या आहे. एकदा त्या जंजाळात पाय ठेवला की त्यात अक्षरश: आपण अडकून जातो आणि विनाकारण खूप वेळ वाया जातो. त्यामुळे स्क्रिन टाईम खूप कमी करा.
3 / 6
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार बाजारात अनेक माईंड गेम मिळतात. हे खेळ विद्यार्थ्यांनी आवर्जून खेळले पाहिजेत. यामुळे एकाग्रताही वाढते आणि बुद्धिमत्तेलाही चालना मिळते.
4 / 6
विद्यार्थ्यांनी स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष द्या. मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या तुम्ही फिट असाल तर त्याचा चांगला परिणाम अभ्यासावर दिसून येतो.
5 / 6
आहारातून जास्तीतजास्त पौष्टिक पदार्थ घेण्याचा प्रयत्न करा. संतुलित आहार घेणे आरोग्यासाठी आणि मेंदूच्या विकासासाठी उत्तम ठरते.
6 / 6
मित्रमैत्रिणींची निवड योग्य करा. तुमच्या ग्रुपमधले सगळेच जण अभ्यासू, चौकस, हुशार, मेहनती, सकारात्मक विचारांचे असतील तर त्याचा खूप चांगला परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वावरही होतो. त्यामुळे चांगली संगती मिळविण्याचा नेहमीच प्रयत्न करा.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सStudentविद्यार्थीkidsलहान मुलंfoodअन्नMobileमोबाइल