शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुलांना मातीत, गवतामध्ये अनवाणी चालू द्या आणि तुम्हीही चाला, कारण..... वाचा ५ जबरदस्त फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2024 3:14 PM

1 / 8
हल्ली बहुतांश लोक घरात चप्पल घालतात. घरात चप्पल, घराबाहेरही चप्पल त्यामुळे अनवाणी चालणे आता जवळपास आपण विसरतच जात आहोत.
2 / 8
मुलंही खेळण्यासाठी जेव्हा घराबाहेर जातात, तेव्हा त्यांच्याही पायात चपला असतातच. पण अनवाणी पायांनी मुलांना जमिनीवर, मातीवर, गवतावर चालू देणं खूप गरजेचं आहे. फक्त मुलांसाठीच नाही, तर मोठ्या माणसांसाठीही ते अत्यावश्यक आहे.
3 / 8
अनवाणी पायाने गवतावर, मातीवर चालण्याचे काय फायदे आहेत, याविषयी माहिती देणारी एक पोस्ट सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी नुकतीच सोशल मिडियावर शेअर केली आहे.
4 / 8
मातीवर, गवतावर अनवाणी चालल्याने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया अधिक जलद होते.
5 / 8
यामुळे स्ट्रेस कमी होऊन शरीरातील हॅप्पी हार्मोन्स वाढण्यास मदत होते.
6 / 8
शांत झोप येण्यास मदत होते. त्यामुळे निद्रनाश असणाऱ्या व्यक्तींनी थोडा वेळ का होईना पण अनवाणी चालावे.
7 / 8
एनर्जी लेव्हल आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
8 / 8
बॉडी बॅलेंन्सिंग वाढते आणि तळपायांचे स्नायू बळकट होतात.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सkidsलहान मुलं