शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

झाडं भराभर वाढतात पण फुलंच येत नाहीत? स्वयंपाक घरातले ५ पदार्थ वापरा- बागेत पडेल फुलांचा सडा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2023 3:02 PM

1 / 7
असं बऱ्याचदा होतं की आपल्या बागेतली फुलझाडं नुसतीच वाढतात. उंच होतात. पण त्यांना फुलं मात्र अगदीच कमी येतात. आता माेगरा, गुलाब, जास्वंद, मधुमालती, मधुकामिनी अशा झाडांना फुलंच येत नसतील, तर त्यांचा काय उपयोग...
2 / 7
म्हणूनच अशा झाडांसाठी तुमच्या स्वयंपाक घरातले काही पदार्थ वापरा. झाडांना नियमितपणे हे पदार्थ मिळत गेले तर त्यांना फुलं येण्यासाठी किंवा त्यांची चांगली वाढ होण्यासाठी दुसरं कोणतंही खत टाकण्याची गरज राहणार नाही. झाडांची चांगली वाढ होऊन ते हिरवेगार तर होतीलच, पण त्यांना भरपूर फुलंही येतील.
3 / 7
यातला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे सोयाबिन. २ टेबलस्पून सोयाबिन ग्लासभर पाण्यात भिजत टाका. ७ ते ८ तास भिजू द्या. नंतर हे पाणी थोडं थोडं करून झाडांना घाला. यातून झाडांना भरपूर प्रमाणात नायट्रोजन मिळेल.
4 / 7
केळीची सालं अर्धी बादली पाण्यात ८ ते १० तास भिजत घाला. नंतर हे पाणी गाळून घ्या आणि झाडांना द्या. या उपायामुळे झाडांना पोटॅशियम आणि फॉस्फरस मिळेल.
5 / 7
तांदूळ भिजत घातलेलं पाणीही नियमितपणे झाडांना द्यावं. त्यातून झाडांना पोटॅशियम मिळतं जे फुलांच्या वाढीसाठी उत्तम असतं.
6 / 7
सफरचंदाची सालं भिजवलेलं पाणीही झाडांच्या वाढीसाठी एक उत्तम खत आहे.
7 / 7
वूड ॲश म्हणजेच लाकडाची राखदेखील झाडांसाठी पोषक असते. यामुळे मुळं जमिनीला घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे झाडांची चांगली वाढ होते.
टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्सPlantsइनडोअर प्लाण्ट्सWaterपाणीFlowerफुलं