शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाल्कनीत वर्षभर रंगबेरंगी फुलं हवी? ५ रोपं लावा- सुंदर फुलांनी नेहमीच सजलेली राहील बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2024 2:46 PM

1 / 6
काही लोकांना फुलझाडांची खूपच आवड असते. तुम्हालाही तशीच आवड असेल आणि तुमच्या बाल्कनीचा किंवा बागेचा एखादा कोपरा फुलझाडांनी भरून टाकायचा असेल तर या काही रोपांची निवड करा
2 / 6
वर्षभर फुलंं देणारं रोप म्हणजे ऑफिस टाईम. हिवाळ्यात याला येणाऱ्या फुलांचं प्रमाण वाढतं. उन्हाळ्यात थोडं कमी होतं, पण फुल मात्र नक्की येतात.
3 / 6
दुसरं आहे छोटे चिनी गुलाब. अगदी छोट्याशा कुंडीतही तुम्ही ते लावू शकता. गुलाबी, केशरी, पिवळा, पांढरा अशा वेगवेगळ्या रंगात ते येतं.
4 / 6
तिसरं म्हणजे लँटिना. लँटिनाला जांभळी, गुलाबी, केशरी, पांढरी अशी वेगवेगळ्या रंगाची सुंदर नाजूक फुल येतात. एखाद्या ऋतूमध्ये फुलांचं प्रमाण कमी होतं. पण मोठा खंड मात्र पडत नाही.
5 / 6
जास्वंदाचं रोपही बारमाही फुल देणार आहे. वेगवेगळ्या रंगाची जास्वंद आणून तुम्ही कुंडीत सजवू शकता.
6 / 6
इझोराला देखील नेहमीच फुलं येतात. आणि ती फुलं गुच्छाने येतात. त्यामुळे ते रोप आणखीच छान बहरलेलं दिसतं.
टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्सTerrace Gardenगच्चीतली बागPlantsइनडोअर प्लाण्ट्सFlowerफुलं