1 / 7सध्या सुर्यदेव खूपच कोपला आहे. त्यामुळे दुपारच्यावेळी घराबाहेर डोकावून पाहण्याचीही इच्छा होत नाही. पण बहुतांश लोकांना मात्र कामानिमित्त घराबाहेर पडावेच लागते.. गॉगल, स्कार्फ, सनकोट असं सगळं घालून अंग पुर्णपणे झाकून घेतलं तरी अनेकांना सनबर्नचा त्रास होतो.2 / 7यामध्ये अंगावर लालसर चट्ट आल्यासारखं होतं. काही जणांना अंगावर बारीक पुरळ येऊन खाज येते. काही जणांच्या त्वचेवर लाल चट्टे येऊन नंतर ते काळे पडतात. असा सनबर्नचा काेणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्याठिकाणी स्वयंपाक घरातले काही पदार्थ लावा.. त्या भागात होणारी जळजळ, आग थांबून थंडावा वाटेल. 3 / 7पहिला उपाय म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला सनबर्न झाले आहे त्याठिकाणी फ्रिजमधले थंडगार दही लावा. १० ते १५ मिनिटांनी थंड पाण्याने धुवून टाका. दह्यामध्ये असणारे प्रोबायोटिक्स आणि लॅक्टीक ॲसिड त्वचेचा दाह कमी करण्यास मदत करतील.4 / 7फ्रिजमध्ये ठेवलेलं थंडगार कच्चं दूधही तुम्ही सनबर्न झालेल्या ठिकाणी लावू शकता. यामुळेही लगेचच त्या भागाची आग थांबून गार वाटेल.5 / 7प्लेन ओट्स मिक्सरमध्ये फिरवून त्याची अगदी बारीक पावडर करा. ही पावडर पाण्यात कालवून सनबर्न झालेल्या ठिकाणी लावा. आराम वाटेल.6 / 7मधाला nature's healing balm म्हणून ओळखले जाते. तसेच मध हे नॅचरल मॉईश्चरायझर देखील आहे. त्यामुळे सनबर्न झालेल्या ठिकाणी मध लावून १० ते १५ मिनिटांनी धुवून घ्या. जखमेला येणारी खाज किंवा आग कमी होईल.7 / 7साजूक तूप किंवा साय लावल्यानेही सनबर्न झालेली त्वचा मऊ पडते आणि त्रास कमी होतो.