शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नकळतपणे पालकांकडूनच मुलांना लागू शकतात ५ चुकीच्या सवयी, बघा तुमच्याकडूनही नेमकं तेच होतंय का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2024 3:06 PM

1 / 7
आई आणि वडील या अशा दोन व्यक्ती असतात ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जबरदस्त छाप त्यांच्या मुलांवर पडत असते. मुलांनी आत्मसात केलेल्या बहुतांश गोष्टी ते पालकांकडूनच शिकलेले असतात.
2 / 7
कधी कधी मुलं काहीतरी चुकीचं वागतात. किंवा मुलं थोडी मोठी झाली की ते अशा काही चुका करू लागतात, जे पाहून पालकांना वैताग येतो. मुलांच्या वागण्याचा त्रास होतो. पण मुलांच्या अशा चुकीच्या वागण्यामागे पालकांच्याच काही सवयी कारणीभूत असू शकतात. त्या सवयी नेमक्या कोणत्या ते पाहा..
3 / 7
जर तुमची मुलं तुमच्याशी, इतर मुलांशी किंवा त्यांच्या भावंडांशी ओरडून बोलत असतील तर कदाचित तुम्ही मुलांशी किंवा एकमेकांशी तसं बोलता का ते एकदा तपासून पाहा..
4 / 7
ताण आल्यावर तुम्ही मुलांवर, जोडीदारावर चीडचीड, आरडाओरडा करत असाल तर तुमची मुलंही मोठे होऊन तसंच करतील. त्यांचा राग, स्ट्रेस तुमच्यावर काढतील.
5 / 7
तुम्ही मुलांना सतत कामामध्ये व्यस्त असताना दिसत असाल तर मुलं तुमच्याकडून तुमची कष्टाळू वृत्ती घेतील. तुम्ही त्यांच्यासमोर कायम आळस दाखवला तर हळूहळू मुलंही त्याच वळणावर जाऊन आळशी होतील.
6 / 7
मुलांनी व्यायाम करावा, फिटनेस जपावा असं वाटत असेल तर आधी तुम्ही ते करायला हवं. तुम्ही नियमितपणे व्यायाम करताना, आरोग्याची काळजी घेताना मुलांना दिसलात तरच मुलांपर्यंत ती शिकवण जाईल, असं हार्वर्ड टी. एच. चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ यांच्या अभ्यासानुसार दिसून आलं आहे.
7 / 7
तुमच्याकडे खूप पैसा असला तरी मुलांसमोर त्याचा उधळपणा करू नका. मुलांसमोर किंवा मुलांसमोर नेहमीच मोजूनमापून खर्च करा. त्यांना पैशांची किंमत कळू द्या. अन्यथा ते जसेजसे मोठे होतीत तशी तशी त्यांची उधळपट्टी वाढत जाईल.
टॅग्स :Parenting Tipsपालकत्वkidsलहान मुलं