शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

योगा- व्यायाम करायला वेळच नाही? फक्त ५ मिनिटांचे 'असे' स्ट्रेचिंग करा, वजन मुळीच वाढणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2024 1:36 PM

1 / 9
वजन तर वाढत चाललं आहे, पण ते कमी करण्यासाठी किंवा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी, फिटनेस जपण्यासाठी व्यायाम, योगा करणं अजिबात शक्य होत नाही, असं अनेक जणींचं होतं.
2 / 9
घरातली कामं, ऑफिसची कामं, घरातल्या सगळ्यांच्या वेळा सांभाळताना योगा, जीम यासाठी अनेकींना वेळ मिळत नाही. किंवा काही जणींकडे वेळ असला तरी त्यांना तासभर योगा किंवा जीमला जाणं कंटाळवाणं वाटतं.
3 / 9
म्हणूनच तुमच्या बाबतीतही असंच असेल तर स्वत:साठी फक्त ५ मिनिटांचा वेळ काढा आणि हे काही स्ट्रेचिंगचे प्रकार नियमितपणे करा. यामुळे वजन तर कंट्रोलमध्ये राहीलच पण फिटनेसही जपला जाईल. याविषयीचा एक व्हिडिओ yoginidharna या इन्स्टाग्राम पेजवर सुचविण्यात आला आहे.
4 / 9
यामध्ये सांगितलेलं पहिलं स्ट्रेचिंग म्हणजे बालासन ते भुजंगासन आणि पुन्हा भुजंगासन ते बालासन असं रिपिट करणे. असं १० ते १५ वेळेस करा.
5 / 9
दुसऱ्या स्ट्रेचिंगमध्ये मांडी घालून बसा. दोन्ही हात वर करून तळहात एकमेकांत गुंफून घ्या. यानंतर कंबरेतून एकदा डाव्या बाजुला आणि नंतर उजव्या बाजुला असं वाका. असं दोन्ही बाजुला प्रत्येकी १०- १० सेकंद करा.
6 / 9
तिसरं स्ट्रेचिंग आहे साईड ट्विस्ट. यामध्ये मांडी घालून बसा आणि दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा. यानंतर उजव्या बाजुने वळून मागच्या भिंतीवर नजर लावा. नंतर डाव्या बाजुनेही वळून तसंच करा. दोन्ही अवस्था प्रत्येकी १०- १० सेकंद टिकवून ठेवा.
7 / 9
यानंतर १० सेकंदासाठी कॅमल पोज करा.
8 / 9
पुढच्या १० सेकंदासाठी श्वानासन करा.
9 / 9
यानंतर ३० ते ४० सेकंदासाठी मलासन करा. हा व्यायाम प्रत्येक महिलेसाठी खूप फायदेशीर ठरणारा आहे. एवढे स्ट्रेचिंग तुम्ही नियमितपणे केले तरी तुमचा फिटनेस बऱ्यापैकी जपला जाईल.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सExerciseव्यायामWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सYogaयोगासने प्रकार व फायदे