शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नेहमी तरुण राहायचं- सुंदर दिसायचं? फक्त ५ सोप्या सवयी लावून घ्या, तारुण्य सरणारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2024 12:28 PM

1 / 6
या काही सवयी अशा आहेत की ज्या तुम्हाला नेहमीच चिरतरुण ठेवतील. तुमच्या वयाचा आकडा भलेही वाढेल, पण तुमच्याकडे पाहून तुमचं वय झालं आहे, असं कोणीही तुम्हाला म्हणणार नाही. या सवयी नेमक्या कोणत्या ते पाहा...
2 / 6
१.दिवसाची सुरुवात नेहमी आनंदाने करा. पुन्हा तेच रुटीन, तेच काम असा कंटाळवाणा सूर काढत दिवसाची सुरुवात नकाेच.. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया यांच्या संशोधनानुसार जे लोक आनंदाने दिवसाची सुरुवात करतात त्यांच्यामध्ये स्ट्रेस हार्मोनची पातळी खूप कमी असते. स्ट्रेस हार्मोन जास्त असेल तर एजिंग प्रोसेस लवकर सुरू होते.
3 / 6
२. तुमचं बॉडी पोश्चर नेहमी ताठ ठेवा. यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
4 / 6
३. अल्टरनेटीव्ह थेरपीज इन हेल्थ ॲण्ड मेडिसिन यांच्या अभ्यासानुसार जर नियमितपणे तुम्ही योगा, प्राणायाम केले तर त्यामुळे एजिंग प्रोसेस खूप स्लो होते.
5 / 6
४. जवसामध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा अधिक तरुण, सुंदर होते. केसांसाठीही ते फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुमच्या आहारात नेहमीच जवस असू द्या.
6 / 6
५. आहारावरही तुमचे सौंदर्य आणि फिटनेस अवलंबून आहे. त्यामुळे आहाराकडे नेहमीच विशेष लक्ष द्या. तेलकट, तुपकट, मसालेदार, जंकफूड असे पदार्थ खाऊ नका. बाहेरचे कमीतकमी खाऊन घरचा सात्विक आहार घेण्यावर भर द्या.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHair Care Tipsकेसांची काळजीFitness Tipsफिटनेस टिप्सExerciseव्यायामYogaयोगासने प्रकार व फायदे