शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रोजच्या पोळ्या होतील खूप पौष्टिक! भिजवताना कणकेत घाला ५ पदार्थ - साधी पोळीही लागेल चवदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2024 2:20 PM

1 / 7
भाजीबाबत आवडीनिवडी असल्या तरीही घरातले सगळे सदस्य पोळ्या खातातच. म्हणूनच त्या पोळ्या अधिक पौष्टिक असणं गरजेचं आहे.
2 / 7
म्हणूनच रोज आपण पोळ्यांसाठी जेव्हा कणिक भिजवतो तेव्हा त्यात काही पदार्थ टाका. या पदार्थांमुळे पोळ्यांना छान चव तर येईलच पण त्यांच्यातले पौष्टिक घटकही कितीतरी पटीने वाढतील. अशी गरमागरम पोळी मग तुपासोबत खाल्ली तरी ती खूप चवदार लागेल.
3 / 7
कधी कधी कणकेमध्ये शेवग्याच्या पानांची पावडर टाका. प्रत्येक १ वाटी कणकेसाठी १ चमचा शेवगा पावडर वापरा. यामुळे तुमच्या साध्याच पोळ्या सुद्धा सुपरफूड होतील. शेवग्यामध्ये व्हिटॅमिन ए, लोह, फायबर, ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
4 / 7
दुसरा पदार्थ आहे हळद. त्यामध्ये ॲण्टी इन्फ्लामेटरी घटक आणि ॲण्टी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पचनाचा त्रास, नैराश्य, ॲलर्जिक त्रास कमी होण्यास मदत होते.
5 / 7
जवस थोडे बारीक करा आणि मिक्सरमधून बारीक करून घ्या. ही पावडर कणिक मळताना त्यामध्ये घाला. जवसामध्ये अल्फा लिनोलेनिक ॲसिड, फायबर, ओमेगा ३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात. अशी पोळी खाणं हृदयासाठीही चांगलं आहे.
6 / 7
कणिक भिजवताना त्यात कधी कधी ओवा टाकणंही आरोग्यासाठी अतिशय फायद्याचं आहे. ओव्यामध्ये ॲण्टी मायब्रोबियल आणि ॲण्टी इन्फ्लामेट्री घटक असतात. त्यामुळे पचनक्रिया चांगली होण्यासाठी ते फायदेशीर असतात. ज्यांना वारंवार गॅसेस, ॲसिडीटी असा त्रास होतो, त्यांच्यासाठी अशी पोळी खाणं जास्त फायदेशीर आहे.
7 / 7
मेथी दाण्यांची पावडर पोळीमध्ये टाकल्यास त्यातून व्हिटॅमिन ए, सी, के तसेच पोटॅशियम, कॅल्शियम, लोह असे घटक भरपूर प्रमाणात मिळतात. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठीही त्याचा फायदा होतो.
टॅग्स :foodअन्नCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.RecipeपाककृतीHealth Tipsहेल्थ टिप्स