5 sweet dishes for bhaiduj, 5 quick mithai recipies for diwali
भाऊबीजेसाठी झटपट होणारे ५ चवदार गोड पदार्थ! स्वयंपाक होईल भराभर- गप्पा होतील पोटभर.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2024 1:15 PM1 / 7भाऊबीजेच्या दिवशी लग्न झालेल्या बहिणींच्या घरी त्यांचा भाऊ जातो किंवा मग बहीण माहेरी येते. या दोन्ही परिस्थितीत बहिणीला आपल्या भावाला स्वत:च्या हाताने काहीतरी गोडधोड करून खाऊ घालावं वाटतं.2 / 7पण स्वयंपाकात वेळ गेला तर मग भावाशी मनमाेकळ्या गप्पा कधी मारणार हा प्रश्न पडतोच. म्हणूनच तर मग भाऊबीजेच्या दिवशी तुमच्या भावासाठी असे काही गोड पदार्थ करा जे करण्यासाठी खूपच कमी वेळ लागेल. आता असे गोड पदार्थ नेमके कोणते ते पाहा..3 / 7सगळ्यात सोपा गोड पदार्थ म्हणजे बासुंदी. बासुंदी करणं खरंच खूप सोपं आहे. एकीकडे दुधाचं पातेलं उकळायला ठेवलं की दुसरीकडे तुमचा स्वयंपाक करायला तुम्ही मोकळे होता. त्यात अजिबात अडकून बसण्याची गरज नसते. बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत दूध छान आळून येतं. त्यामुळे बासुंदी पुरी असा बेत तुम्ही भाऊबीजेला करू शकता.4 / 7झटपट होणारा दुसरा गोड पदार्थ म्हणजे श्रीखंड. जर बाजारात विकत मिळणारं चक्का दही आणलं तर त्या दह्यापासून श्रीखंड करायला अवघे १५ मिनिटही पुरेसे होतात. त्यामुळे श्रीखंड- पुरीचा विचार करायला हरकत नाही.5 / 7शेवयाची खीर हा पदार्थही खूप झटपट होतो. शिवाय त्यासाठी मोजक्याच वस्तू लागतात. 6 / 7शेवयाची खीर हा प्रकार खूप कॉमन वाटत असला तर मखाना खीरसुद्धा तुम्ही करू शकता. मखाना खीरदेखील अतिशय कमी वेळात करता येते.7 / 7पावभाजी, पुरीभाजी असा बेत ठेवणार असाल तर त्यासोबत फ्रुट सलाड देखील करू शकाल. नेहमीचे गोड पदार्थ खाऊन तसंही बऱ्याचदा कंटाळाच येतो. त्यामुळे हा वेगळा पदार्थ तुमच्या भावाला नक्कीच आवडू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications