शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लक्ष्मीपूजन: परफेक्ट पुरणपोळी करण्यासाठी ५ टिप्स; इतकी मऊसूत होईल की खाल एखादी जास्तच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2024 1:00 PM

1 / 6
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बहुतांश घरांमध्ये नैवेद्यासाठी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. तसं तर आपण पुरण बऱ्याचदा करतो. पण यावेळी तुमच्या हातची पुरणपोळी अतिशय चवदार, स्वादिष्ट, खमंग व्हावी यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवा. (how to enhance the taste of puran poli?)
2 / 6
पुरण कधीही नुसत्या साखरेचे किंवा नुसत्या गुळाचे करू नका. गुळ आणि साखर समप्रमाणात घालून तयार केलेली पुरणपोळी अधिक खमंग लागते. तिला अगदी पेढ्यासारखी चव येते.
3 / 6
पुरण शिजवत असताना त्याच्यामध्ये बाजारात विकत मिळणारी वेलची पूड घालू नका. त्याऐवजी घरी तयार केलेली अगदी ताजी वेलची पूड घाला. शिवाय जेव्हा पुरणाला पुर्णपणे चटका देऊन होईल, त्यावेळी अगदी शेवटी वेलचीपूड घालावी. यामुळे पुरणाला जास्त छान सुगंध येतो.
4 / 6
पुरणामध्ये जायफळ घालत असताना जायफळाची पूड जशीच्या तशी पुरणामध्ये घालू नका. त्याऐवजी ती थोडी चमचाभर पाण्यात कालवून घ्या आणि मग पुरण शिजत असताना कढईमध्ये घाला.
5 / 6
वेलची, जायफळ यासोबतच पुरणामध्ये थोडंसं केशरही घाला. यामुळे पुरणपोळीचा स्वाद अधिक खुलून येतो.
6 / 6
पुरण पोळी भाजताना तव्यावरच तिला अगदी थोडेसे तूप लावा. यामुळे तिचा खमंगपणा आणखी वाढतो. पण तूप खूप जास्त लावू नका. कारण तवा गरम असल्यामुळे तुपाची वाफ होते, धूर निघतो. त्यामुळे अगदी थोडेच तूप लावा आणि नंतर ताटात वाढल्यावर त्यावर भरपूर तूप घालून खा.
टॅग्स :foodअन्नCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.RecipeपाककृतीDiwaliदिवाळी 2024