5 Tips to keep yourself young forever according to american doctor mark hyman
कायम तरूण राहण्यासाठी करायच्या ५ गोष्टी, अमेरिकन डॉक्टरांचं सिक्रेट- खरं वय ऐकाल तर चकीत व्हाल! By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 2:04 PM1 / 7आपण कायम तरूण दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण वाढत्या वयात प्रत्येकालाच आपल्या शरीरयष्टीत, चेहऱ्यात बदल झालेला जाणवतो. जर खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेतली तर तुम्ही वृद्धावाच्या लक्षणांना लांबणीवर टाकू शकता. याच सिद्धांतावर अमेरीकन डॉक्टर मार्क हायमन हे वयाच्या ६३ व्या वर्षीही निरोगी आणि तंदरूस्त असल्याचे दिसून आले आहेत. (5 tips to keep yourself young forever according to american doctor mark hyman) 2 / 7त्यांनी यंग फॉरेव्हर नावचं पुस्तकही लिहिलं आहे. (Anti ageing tips) यात त्यांनी कायम तरूण दिसण्याचे काही उपाय सांगितले आहेत. नेहमी तरूण दिसण्यासाठी अमेरिकन डॉक्टर काय काय करतात ते पाहूया. (Anti Ageing Tips) 3 / 7 डॉ. मार्क हे जेवणात शाकाहारी पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. झाडांपासून मिळत असलेल्या या पदार्थांमध्ये फायटोकेमिकलल जास्त प्रमाणात असते. यामधून योग्य प्रमाणात पोषण मिळते. 4 / 7अमेरिकन डॉक्टर फिट राहण्यासाठी व्यायामावर पूर्ण लक्ष देतात. यासाठी त्यांना प्रोटीन डाएटची सुद्धा आवश्यकता असते. म्हणूनच ते व्यायामाच्या १ तास आधी प्रोटीन शेक घेतात. 5 / 7फिट आणि तरूण दिसण्यासाठी डॉक्टर आठवड्यातून ४ ते ५ वेळा व्यायाम करण्याचा सल्ला देतात. यासाठी ते रेजिस्टंट बॅण्डचा वापर करतात. यामुळे जखम होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय रोड बायकिंग, माऊंटेन बायकिंग, टेनिस, स्विंमिंगसुद्धा करतात.6 / 7डॉक्टरांनी रोज ७ ते ८ तासांची झोप घेण्याचा सल्ला दिला आहे. ते रात्री 10 पर्यंत झोपतात आणि सकाळी 6-7 वाजता उठतात. तसेच झोपण्यापूर्वी संपूर्ण खोलीत अंधार असल्याची खात्री करतात.7 / 7वाढत्या वयात शरीर लवचीक राहण्यासाठी योगाकडे लक्ष देणंसुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अमेरिकन डॉक्टर त्यांच्या रोजच्या रुटीनमध्ये योगाचा समावेश करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications