शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

‘या’ ५ वेळा दाखवतात हमखास चुकीचं वजन, ‘यावेळी’ कधीच वजन करु नका कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2024 9:09 AM

1 / 8
स्वतःच्या वजनाचा काटा डाव्या बाजूला सरकतो आहे की उजव्या बाजूला सरकतो आहे, याबाबत अनेक जण खूप जास्त जागरूक असतात. (5 Worst Timings To Check Your Weight)
2 / 8
वजनाचा काटा थोडाही इकडे- तिकडे झाला किंवा खास करून उजवीकडे वळाला की त्यांना अस्वस्थ होतं.(which is the correct time to check your weight)
3 / 8
म्हणूनच तुम्हाला तुमचं वजन किती आहे, याचा अचूक आकडा पाहिजे असेल तर या ५ वेळांना अजिबात वजन करू नका. यामुळे तुमचं वजन आहे त्यापेक्षा अधिक किंवा कमी दिसून येईल, अशी माहिती आहारतज्ज्ञ दीपिका जैन यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून दिली आहे.
4 / 8
नाश्ता केल्यानंतर किंवा जेवण केल्यानंतर कधीही वजन करू नका. ते नेहमीच जास्त असेल.
5 / 8
व्यायाम करून आल्यानंतर लगेचच वजन करणे टाळा. ते नक्कीच तुमच्या वजनापेक्षा कमी भरेल..
6 / 8
पोटभर पाणी प्यायल्यानंतर किंवा एखादा ज्यूस, चहा, कॉफी किंवा कुठलंही सरबत घेतल्यानंतर कमीत कमी अर्धा तास वजन करू नये.
7 / 8
मासिक पाळीदरम्यान वजन करू नका. कारण त्यादरम्यान शरीरात हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे वजन आहे त्या वजनापेक्षा थोडं जास्त भरतं.
8 / 8
सकाळी उठल्यानंतर लगेचच वजन करू नका. कारण त्यावेळी काही जणांना डिहायड्रेशन होतं तर काही जणांना ब्लोटिंग, अंग सुजण्याचा त्रास होत असतो. त्यामुळे त्यावेळी वजन केल्यास समोर येणारा आकडा खोटा असू शकतो.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सExerciseव्यायामMenstrual Healthमासिक पाळी आणि आरोग्य