शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

संत्री- मोसंबीच्या सालींचे तुम्ही विचारही केला नसेल एवढे भन्नाट उपयोग, ६ खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2024 3:15 PM

1 / 7
संत्री- मोसंबीच्या साली किती वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतात हे एकदा पाहा.. त्यांचे हे एक से एक उपयोग पाहून तुम्ही त्या साली कधीही टाकून देणार नाही.
2 / 7
एका पातेल्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये संत्री, मोसंबीच्या साली, ४ ते ५ लवंगा आणि दालचिनीचा एक छोटासा तुकडा टाकून ते उकळा. हे पाणी थंड झाल्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवल्यास रुम फ्रेशनर म्हणून त्याचा वापर करता येतो.
3 / 7
वरील उपाय करायचा नसेल तर संत्री किंवा मोसंबीच्या साली एका सुती पिशवीमध्ये टाका. त्या पिशवीचं तोंड थोडंसं उघडं ठेवा आणि ती पिशवी घरातल्या एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्या. घरात एक छान सुगंध दरवळेल.
4 / 7
बुटांंमधून किंवा शू रॅकमधून कुबट वास, दुर्गंध येत असेल तर त्यामध्ये संत्रीच्या साली ठेवून द्या. बुटांमधली, शू रॅकमधली दुर्गंधी कमी होईल.
5 / 7
संत्रीच्या साली लाकडी फर्निचरवर घासल्यास त्याची चमक आणखी वाढण्यास मदत होते.
6 / 7
संत्री किंवा मोसंबीचे मधोमध २ तुकडे करा. त्यानंतर त्यातला फळाचा सगळा भाग काढून घ्या. आता त्या सालांचा छान वाटीसारखा आकार तुमच्या समोर असेल. त्यात थोडे तेल टाका. जिथे संत्रीचं देठ असतं तिथे सालाच्याच धाग्यांसारख्या काही दशा असतील. त्या दिव्यातल्या ज्योतीप्रमाणे पेटवून द्या. संत्री- मोसंबीचा हा भन्नाट दिवा तुमच्या घराला सुगंधी करेल.
7 / 7
संत्री- मोसंबीच्या साली मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि त्याचा लेप थोडंसं दूध टाकून चेहऱ्याला लावा. चेहरा चमकदार होण्यास मदत होईल.
टॅग्स :Cleaning tipsस्वच्छता टिप्सSocial Viralसोशल व्हायरलkitchen tipsकिचन टिप्सHome remedyहोम रेमेडीfruitsफळे