शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वयंपाक घरातला सौंदर्याचा खजिना- बघा 'या' ६ पदार्थांची कमाल, फेशियल- क्लिनअपची गरजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2024 3:07 PM

1 / 9
स्वयंपाक घरातून जसं सगळ्या घराचं आरोग्य जपलं जातं, तसंच तिथूनच सौंदर्य टिकवून ठेवण्याचे अनेक उपायही करता येतात.
2 / 9
फेशियल, क्लिनअप करण्यासाठी अनेकजणींना वारंवार पार्लरमध्ये जाणं शक्य नसतं. काही जणींकडे तेवढा वेळ नसतो, तर काही जणींना एवढा भरमसाठ पैसा पार्लरमध्ये जाऊन खर्च करण्याची इच्छा नसते.
3 / 9
म्हणूनच अशा प्रत्येकीसाठी तुमचं स्वयंपाकघर हाच एक मोठा सौंदर्याचा खजिना ठरू शकतो. स्वयंपाक घरातले आपल्या रोजच्या वापरातले काही पदार्थ जर त्वचेसाठी नियमितपणे वापरले तर नक्कीच त्वचेचे सौंदर्य छान खुलून येईल (food that helps for natural glowing skin) आणि मग फेशियल- क्लिनअप यासारख्या ब्यूटी ट्रिटमेंट्स करण्यासाठी वारंवार पार्लरमध्ये जाण्याची गरजच उरणार नाही.
4 / 9
यातला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे हळद. त्वचेवर चमक आणण्यासाठी मध किंवा दह्यामध्ये हळद टाकून नियमितपणे तो लेप चेहऱ्याला लावा. त्वचा चमकदार होईल.
5 / 9
त्वचेतला ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दही अतिशय उपयुक्त आहे. ताज्या दह्याने चेहऱ्याला आठवड्यातून एकदा मसाज करा. त्वचा नेहमीच मऊ, तुकतुकीत राहील.
6 / 9
त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी आठवड्यातून एकदा त्वचेवर नुसता मध लावून हलक्या हाताने मसाज करा आणि एखाद्या मिनिटाने चेहरा धुवून टाका.
7 / 9
त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी काकडीचा रस लावून चेहऱ्याला मसाज करा. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या न येता त्वचा अधिककाळ तरुण राहण्यास मदत होते.
8 / 9
पाचवा पदार्थ आहे लिंबू. लिंबाला नॅचरल स्किन व्हाईटनिंग एजंट म्हणून ओळखलं जातं. कच्चं दूध, मध, दही यामध्ये लिंबू पिळून त्वचेला लावा. यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.
9 / 9
सहावा पदार्थ आहे बेसन पीठ. नॅचरल स्क्रबर म्हणून हरबरा डाळीचं पीठ ओळखलं जातं. दूध, दही, मध, लिंबू यामध्ये मिसळून बेसन पीठाने त्वचेला मालिश केल्यास डेड स्किन निघून जाण्यास मदत होते.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHome remedyहोम रेमेडीkitchen tipsकिचन टिप्स