7 designer blouses worn by Urvashi Rautela, this Diwali try fashionable blouse
उर्वशी रौतेलाने घातलेले ७ डिझाईनर ब्लाऊज, हात-दंडही दिसतात बारीक आणि मिळतो रॉयल लूक By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2024 5:30 PM1 / 10दिवाळी म्हटलं की शॉपिंग आलीच (Shoping). खरेदीला गेल्यावर आपण हमखास पारंपारिक किंवा डिझाईनर साडी (Designer Saree) खरेदी करतो. साडी खरेदी केल्यानंतर ब्लाऊज नेमका कोणत्या पॅटर्नचा शिवायचा कळत नाही(7 designer blouses worn by Urvashi Rautela, this Diwali try fashionable blouse).2 / 10ब्लाऊजचे अनेक फॅशनेबल डिझाइन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण जाड दंड आणि रुंद खांदे असल्यावर कोणते ब्लाऊज डिझाईन शोभून दिसतील? असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात येतो. 3 / 10जर आपले शरीर सडपातळ आणि दंड जाड, शिवाय शोल्डर रुंद असल्यास अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे हे ७ ब्लाऊज डिझाईन ट्राय करून पाहा. संपूर्ण लूक बदलेल, आणि रुंद शोल्डरमुळे शरीर जाडही दिसणार नाही. 4 / 10उर्वशीचे ब्लाऊज कलेक्शन जबरदस्त आहे. तिच्याकडे अनेक प्रकारचे ब्लाऊज आहेत. जर आपली साडी ग्लिटरी असेल तर, आपण स्ट्रॅप ब्लॉऊजही शिवू शकता. 5 / 10रुंद खांद्यांवर स्केवेअर ब्लाऊज डिझाईन सुंदर दिसतील. स्केवेअर नेक ब्लाऊज कोणत्याही साडी पॅटर्नवर शोभून दिसतील. 6 / 10आपण स्लिव्हजलेस ब्लाऊजही शिवू शकता. साडी जर सोनेरी रंगाची असेल तर, त्यावर स्लिव्हजलेस ब्लाऊज शोभून दिसेल. 7 / 10जर आपल्याला आकर्षक लूक हवा असेल तर, आपण ब्रॉड नेक ब्लाऊज ट्राय करू शकता. यामुळे अतिशय रिच लूक मिळेल. 8 / 10स्टायलिश लूक हवा असेल तर, आपण शिमरी ऑफ शोल्डर ब्लाऊज पॅटर्न ट्राय करू शकता. यामुळे दिवाळीत चमकदार लूक मिळेल. 9 / 10जर साडी ग्लिटरी असेल तर, आपण प्लेन व्हि नेक स्लिव्हजलेस ब्लाऊज पॅटर्न ट्राय करू शकता. हा ब्लाऊज पॅटर्न रुंद खांदे असलेल्या महिलांवर शोभून दिसेल. 10 / 10जर आपण लग्न किंवा कोणत्यातरी कार्यक्रमात जात असाल तर, गोटा - पट्टी वर्क डिझाईनचा ब्लाऊज पॅटर्न ट्राय करा. यामुळे लूकला चारचांद येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications